आंबेगाव तालुका तेली महासभेच्या वतीने सोमवारी दि.२८ फेब्रुवारी २०१८ रोजी,तहसीलदार कार्यालय घोडेगाव,ता.आंबेगाव ,जि. पुणे. येथे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ५ वर्षाच्या मुलीवर झालेल्या अन्याविरोधात तहसीलदार यांना जाहीर निषेधार्थ निवेदन आंबेगाव तालुका तेली महासभेच्या वतीने देण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालय या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीला आमिष दाखवून संस्थेतील इसमाने अमानुष लैंगिक अत्याचार करून बलात्कार केला, सदरील घटनेत पीडित मुलीच्या गरीब कुटुंबियांवर दबाव आणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. सदरील प्रकरण अतिशय निंदनीय आहे.
आंबेगाव तालुका तेली महासभेच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला. त्यावेळेस तालुक्यातील प्रचंड तेली समाजाचे बंधू व भगिनि उपस्तित होते व अनेक मान्यवर उपस्तित होते मारूती फल्ले — आध्यक्ष- उत्तर पुणे जिल्हा तेलि महासभा, सोमनाथ फल्ले — पुणे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख तेलि महासभा, वासुदेव कर्पे आध्यक्ष आंबेगाव तालुका तेलि महासभा, रविंद्र कर्पे — आध्यक्ष तिळवण तेली समाज घोडेगाव, सौ. माधवी राम कर्पे — ग्रा. प. सदस्य घोडेगाव, रमाकांत खत्री, नितीन मेहेर, अजित चिलेकर, राजुशेठ कर्पे, अशोक कर्पे, प्रसाद कर्पे, गौरव कर्पे , विजय कर्पे समस्त तेली समाज आंबेगाव तालुका