मावळ तालुका तेली महासभेच्या वतीने सोमवारी दि.२६ फेब्रुवारी २०१८ रोजी,तहसीलदार कार्यालय वडगाव,ता.मावळ,जि. पुणे. येथे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ५ वर्षाच्या मुलीवर झालेल्या अन्याविरोधात तहसीलदार यांना जाहीर निषेधार्थ निवेदन मावळ तालुका तेली महासभेच्या वतीने देण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालय या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीला आमिष दाखवून संस्थेतील इसमाने अमानुष लैंगिक अत्याचार करून बलात्कार केला, सदरील घटनेत पीडित मुलीच्या गरीब कुटुंबियांवर दबाव आणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे.सदरील प्रकरण अतिशय निंदनीय आहे.
मावळ तालुका तेली महासभेच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला. त्यावेळेस तालुक्यातील मान्यवर समाज बांधव सर्वस्वी,श्री.ज्ञानेश्वर दुर्गुडे,तालुका अध्यक्ष श्री.राजेश राऊत,महिला आघाडी विभागीय अध्यक्ष श्रीमती मीराताई फल्ले,सौ.शालिनीताई झगडे,उपाध्यक्ष श्री. शंकरराव कटके(पाटील),उपाध्यक्ष श्री.संतोषशेठ कटके (सरपंच),जेष्ठ मार्गदर्शन श्री.बळीरामदादा धोत्रे, सचिव श्री.सुनील शेडगे,श्री.सुरेश कटके,श्री.राजु कटके,श्री.सागर कटके,श्री.गणेश जगनाडे,श्री.विशाल कटके,श्री.स्वप्नील भागवत आदी समाज बांधव उपस्थित होते.