नेवासा तेली समाज - धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तैलिक समाजाच्यावतीने मूकमोर्चा काढण्यात आला. अत्याचार करणार्या नराधमावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
येथील खोलेश्वर गणपती मंदिरापासून प्रांतिक तैलिक महासभेच्या मूक मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पोलीस निरिक्षक प्रविण लोखंडे व तहसिलइार उमेंश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की अत्याचार करणार्या नराधमावर कडक कारवाई करून गुन्ह्याचा तपास विशेष पथकाकडे देण्यात येऊन यावा, शासकीय धोरणाप्रमाणे अत्याचारित पीडित मुलीला तातडीने मदत करण्यात यावी, पीडीत मुलीच्या पालकांवर दबाव टाकणार्या शिक्षण संस्थेचे चालक व विद्यालयाच्या प्रमुख कर्मचार्यांवर तात्काळ कारवाई करावी.
यावेळी पुरूषोत्तम सर्जे, भानहिवर्याचे सरपंच देविदास साळुंके, शहराध्यक्ष विशाल पवार, तालुका उपाध्यक्ष बबन वाव्हळ, महिला आघाडी अध्यक्षा उषाताई पवार, उपाध्यक्षा अर्चना साळुंके यांनी या घटनेचा निषेध केला. सुधीर वैरागर, कॉ. तात्या कदम यांनी पाठिंबा दिला.
यावेळी दत्तात्रय उगले, भीमराज महाले, अशोक क्षीरसागर, संदीप बाबा, क्षीरसागर पत्रकार विजय खंडागळे, भिवाजी आघाव, भास्कर साळुंके , व्ही. डी. साळुंके, मधुकर सुरसे, अविनाश उगले, रमेश सुदद्रीक देविदास उगले, सुरेश साळुंके, संतोष देशमाने, अशोक सुद्रीक, नारायण आढाव, अमोल पवार, श्रीकांत लोखंडे, महेश सोनवणे, पांडुरंग पवार, सौ. राजश्री पवार, शंकर बाविस्कर, प्रमोद साळुंके, सौ. कांचन पवार, सौ. शैला सर्जे, संगीता बाविस्कतर, वैशाली महाले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.