प्रमुख अतिथी डॉ संजय मगर , लातुर, दिनेश गावत्रे , पुणे, प्रशांत शेवतकर , अकोला सर्वप्रथम संताजी जगनाडे महाराज व माता कर्मादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. श्री प्रशांत शेवतकर व सौ. ज्योती शेवतकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री माणिकराव नालट यांनी केले. सर्वप्रथम आपल्या वाणीतुन स्वत:ला ओळखा . आपल्यातही खूप नविन महत्त्वपूर्ण भूमिका दडलेल्या असतात त्या अनुभवने व स्वत:च्या जीवनात वापरणं गरजेचं आहे. आपली ओळख महत्त्वपूर्ण आहे ती निर्माण झाली पाहिजे. डोकं खाली असेल तर नविन माहिती स्विकारते , डोक्यातील गोंधळ आपणास माहीतीपासुन दुर नेतो.
डॉ. संजय मगर , लातुर
शेवतकर सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वत:ला ओळखा , स्पर्धा परिक्षेसाठी तयार व्हा. स्वत:त ८ ते १० स्किल असावे . झुकतं माप हे समाजाकडे असावं. नातेसंबंधांची जाणीव असावी . सामान्य माणसाचा विचार महत्त्वाचा आहे. संस्कार गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षांची ओळख होणे गरजेचे आहे. परिक्षांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न होतोय. आपला पाल्य फॉर्मल कि इन्फॉर्मल एज्युकेशन मधे प्रगती करेल ते ठरवा . स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम समजून घ्या. नवनिर्मितीसाठी एकाच पद्धतीने विचार करून चालणार नाही. जोखिम घ्यायची तयारी पाहिजे. नविन विचार गरजेचा आहे. समानानुभूती गरजेची आहे. इतरांचा विचार केला पाहिजे. प्रभावी संवादकौशल्य असावे. भावनेचे व्यवस्थापण करता यावे.
दिनेश गावत्रे , पुणे
आजचा दिवस छान आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. अभ्यासात सातत्य असावे . यशाचे गमक आत्मसात करण्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओ त्यांनी दाखविला. आपला गोल निश्र्चित करा. व्हिडिओद्वारे सराव कसा करावा हे स्पष्ट केले. कमळासारखं आयुष्य जगायला शिका .प्रेमाने जगा आणि कामावर प्रेम करा. स्वत:ला बदला
कार्यक्रमास श्री. बालमुकूंद भिरड , श्री. शशिकांत चोपडे , श्री. प्रमोद देंडवे , श्री.दिलीपराव हांडे , श्री. राजेश असलमोल , श्री. अनिल वानखडे ,श्री. विकास राठोड , श्री. सुधीर साकरकर , श्री. दिलीप क्षिरसागर ,श्री. मनोज साहू , श्री. मनिष बिजवे , श्री. विवेक गवात्रे , श्री. बाळासाहेब सोनटक्के , श्री. भुषण भिरड ,श्री. मनोज साकरकर ,श्री. विजय थोटांगे , श्री. रविकांत धनभर , श्री. महादेव गुल्हाने , श्री. सतिष शेंडे , श्री. मनिष थोटांगे , श्री. गजानन बोराडे हे आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री. माणिकराव नालट यांनी केले होते. सुत्रसंचलन सौ. सोनाली नालिंदे यांनी केले.