- प्रकाश कर्डीले, मा. अध्यक्ष, तिळवण तेली समाज पुणे.
समाज उभा आसतो संघटनेवर संघटना आसते कार्यकर्त्यांच्या बळावर कार्यकर्ते आसतात नेत्याच्या नेतृत्वावर जर समाज संघटीत हवा असेल तर कार्यकर्ते हवे असतात. या कार्यकर्त्यांना संघटीत करणारा व ठेवणारा नेता तेवढाच खंबीर असावा लागतो. याचा जीवंत अनुभव म्हणजे खासदार रामदासजी तडस साहेब आहेत. अहमदनगर येथे अध्यक्ष पदाची जबाबदारी येताच ते आपल्या पदाला न्याय देऊ लागले.
देवळी नगरपालीकेचे नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार व आज खासदार हा त्यांचा राजकीय प्रवास. सामाजीक प्रवास म्हणजे सलग १५ वर्ष तेली महासभा प्रांतिक अध्यक्ष. ते अध्यक्ष झाले तेंव्हा विदर्भ व मराठवाडा येथेच काम सुरू होते. परंतू त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला कार्यकर्त्यांना व समाजाला विश्वास दिला. आपल्या शाखा, आपल्या पोटशाखा मतभेद, आर्थिक भेद हे बाजुला ठेवू, एक तेली म्हणुन एकत्र येऊ उच्चवर्णीय जे एकत्र येतात. ते याच भुमीकेतुन तसे एकत्र येण्यास जरूर उशीर झाला पण आपण. लवकरच सावध होवू. ही जिद्द उरात ठेवून त्यांनी समाज घडविला. हे सर्वांना मान्य करावे लागेल कार्यकर्ते विश्वास ही त्यांची साठवण आहे. त्यांचा मतदार संघ देवळी हा मतदार नुसता संभाळत न बसता ते स्वत:च्या पैशाने महाराष्ट्रभर फिरतात कार्यकर्त्यांच्या घरात जावून प्रेमाचे जिव्हाळाचे संघटीतपणे एकीचे संबंध निर्माण करतात. मी अध्यक्ष आहे ही पोकळ हवा त्यांच्याकडे नसते. मला घडण करायची आहे. मी साध्या कार्यकर्त्यातील एक आहे ही जाणीव त्यांच्याकडे आसते. आणि यामुळे त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची कमतरता नसते. त्यांच्याशी संबंधीत झालेला कार्यकर्ता एक वेळ संबंधित झाला की तो संघटनेच्या पदावर आसो नसो. त्याच्या हाकेला ते सोबत करतात. असे आनेक प्रसंग आहेत. ते व्यापात असतात कदाचित फोन उचलणार नाहीत पण काम संपताच त्या कार्यकर्त्या बरोबर स्वत: संपर्क साधुन अडचनी समजुन घेणार ही त्याची कामाची वाटचाल आहे. सुदूंबरे व नागपुर येथिल महा मेळाव्या दरम्यान त्यांच्या संघटन कौशल्याचा अनुभव सर्वाना आलेला आहे.
कार्यकर्त्यांची संख्या वाढली कामाचे मोहळ निर्माण झाले हे सर्व होत असताना मते आली काही भेद समोर आले. परंतु या सर्वावर उत्तम मार्ग काढून त्यांना हासत खेळत गतीशील ठेवली महाराष्ट्रभर पसरलेल्या समाजात असे एक नेतृत्व आहे की त्या या नेत्या बद्दल कुणाचेच दुमत नाही. आजात शत्रु म्हणतात ते त्यांना याच मुळे पुणे समाजाचा विश्वास्त माजी अध्यक्ष म्हणुन त्यांचा माझा जवळचा संबंध आला. या संबंधातुन त्यांच्या कडून माणुस पण संघटन मला समजु शकले त्यांना त्यांच्या वाढदिवसा निमीत्त हार्दीक शुभेच्छा.