एक कुशल नेतृत्व फक्त खा. रामदासजी तडस साहेब - रमेश भोज

 रमेश सदाशिव भोज

      महाराष्ट्र तेली महासभा प्रदेशाध्यक्ष श्री. रामदासजी तडस यांची वर्धा मतदार संघातुन एक लाख पन्नास हजार मताधिक्याने निवडुन येवून तेली समाजाचे एकमेव खासदार म्हणुन संसद मध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन !

                 आपल्या झंझावती शैलीचा ठसा उमटविणारे रामदासजी तडस साहेब होय आम्ही त्यांना साहेबच म्हणतो कारण ते आमचे अगोदरही साहेबच होते आताही आहेत आणि भविष्यात  अनंत कालापर्यंत साहेबच रहाणार आहेत. हे अगदी त्रिवार सत्य आहे. कारण पुर्वीनपासुनच त्यांचे आशिर्वाद आमच्या पाठीशाी आहेत. ते आपल्या समाजात जन्मले हे आपल्या समाजाचे भाग्यच म्हणावे लागेल, त्यांचा परिसस्पर्शा समाजाला झाला आणि संपुर्ण तेली समाजाचे भाग्यच उजाळले असे म्हणण्यातकाहीच वावगे ठरणार नाही. स्वत:च्या बुद्धीमत्तेच्या जोरावर सर्वच क्षेत्रात उत्तम प्रकारे कार्य करून अनेक समाज बांधवांना त्यांनी सर्व प्रकारची मदतच केली आहे. त्यांच्यामुळेच आपल्या तेली समाजाचे नाव संपुर्ण देशात सध्यातरी निघत आहे. यांच्यामुळेच आपला समाज नावारूपाला आलेला आहे. त्याचे कारण म्हणजेच साहेबांचे आपल्या समाजावरील प्रेम त्यांचे आशिर्वाद त्यांचे सहकार्य.

              रामदास तडस साहेब हे एक उत्तुंग व्यक्तीमत्व आहे त्यांच्या यशाच मुळ रहस्य हे आहे की त्यांना सामाजीक कामाचा सतत ध्यास आहे. त्यांची सामाजिक कारर्कीद म्हणजे एक प्रचंड झंझावात आहे. स्वत:ची गुणवत्ता ज्ञान आत्मविश्वास जिद्द  व प्रचंड ध्येयवाद या गुणांच्या जोरावर त्यांनी त्यांच्या अंगी असणार्‍या गुणांची एक झलकच दाखवली आहे. आज कुठलीही जबाबदारी स्वीकरण्याची क्षमता त्यांच्या आहे. म्हणुनच जेवढी महत्वाची व व्यापक अशी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडेल तेवढे समाज व आपल्या हिताचे ठरणार आहे.

 त्यांचा सहवास त्यांच्याशी चर्चा म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग मन आणि मनगट यांचा सुरेश संगम त्यांनी जिवनात विणला आहे. त्यांच्या या गुणांमुळेच अनेक प्रकारच्या अडचणी पचवून उराशी एक प्रकारची जिद्द बाळगुन ते आज आपल्या समोर जिद्दीने उभे आहेत.

 समाजातील नेतृत्व करायचे असेल तर समाजातील सर्व स्तरातील सर्व घटकांना विश्वासात घेवून काम करणे स्पष्ट बोलणे हेवेदावे टाळणे हे गुण अंगी असायलाच पाहिजे अशी  शिकवण त्यांनी आम्हाला अगदी पहिल्यापासुनच दिलेली आहे. त्यामुळे त्यांचा आम्हाला जास्त अभिमान वाटतो. त्यांची कार्यकर्त्यावरील पकड दुरदृष्टी अनेक विषयाचे ज्ञान कामाची पद्धत समाजाचे प्रश्न समजावून घेवुन त्यांची उत्तरे देण्यसाठी केलेली तयारी. आशा अनेक कितीतरी पैलुंनी त्यांचे व्यक्तीमत्व आपल्याला पावलोपावली जाणवतं हे सर्व सहजासहजी घडु शकत नाही त्यासाठी सुरूवातीची कित्येक वर्षे कष्ट करावे लागतात समाजातील अनेक जाणकार व्यक्तींशी चर्चा करावी लागते. हे एक प्रकारचे शिक्षणच म्हणावे लागेल, आणि हे शिक्षण साहेबांनी फार पुर्वीपासुनच समाजाच्या हितासाठी घेतलेले आहे. अस म्हणायला काहीच हरकत नाही.

     त्यांच्या या वाटचालीत त्यांच्या कुटूंबाचे योगदान फार मोलाचं आहे कुटूबांसाठीही त्यांनी देह चंदनासारखा झिजविला आहे. मुलांचे शिक्षण घरातील सर्व प्रकारच्या समस्या वेळोवेळी त्यांनी अगदी सहजपणे सोडविल्या आहेत. स्त्रियांच्या सहभागाशिवाय समाजाचा विकास शक्य नाही हि त्यांची विचार धारा अगदी पहिल्यापासुनच काम आहे. त्यामुळे ते नेहमी त्यांच्या भुमीकेवर ठाम असतात. त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या असंख्य छटा सामाजिक काम करताना आणि ज्या ज्या वेळेस त्यांचा सहवासात आला त्या त्यावेळेस अनुभवायला मिळाला आहे. असे हे कोहिनुर हिर्‍याप्रमाणे अष्टपैलु गुणधर्म असलेले साहेब म्हणजेच आमचे आधारस्तंभ माननीय आदरणीय त्यांच्या भेटीची आम्ही आतुरतेने वाट पहात असतो. असे आमचे साहेब होय साहेबच श्री. रामदासजी तडस .....

     समाजासाठी हितकारक असलेल्या कोणत्याही गोष्टीला किंवा धोरणाला त्यांनी कधीही विरोध केला नाही इतर घडामोडीवर नजर ठेवीत समाजाचा विकास कसा होईल हाच घडामोडीवर नजर ठेवीत समाजाचा विकास कसा होईल हाच विचार त्यंाच्या डोक्यात सतत घोळत असतो. भविष्याची नेमकी चाहुल ज्यांना कळते त्यात ते अग्रभागी आहेत. नेमकी चाहुल ज्यांना कळते त्यात ते अग्रभागी आहेत. नशिबापेक्षा कतृत्वावर व भाग्यापेक्षां कष्टावर विश्वास ठेवणार्‍या मोठेपणा व चांगुलपणा यांचा संगम झालेला संघर्ष व करूणा जोपासुन काम करणारे म्हणुन ज्यांची ख्याती आहे असे व सर्व कार्यकर्त्यांना हवे हवेसे वाटणारे की ज्यांचे नेतृत्व कतृत्व आणि वकृत्व सर्व गुण संपन्न आहे अष्टपैलु नेतृृत्व यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच आमचे साहेब होय साहेबच श्री. तडस साहेब.

         त्यांना राजकारणात विरोधकही मोठ्या प्रमाणात होते त्यांना कोणतेही काम प्रामाणिक करू दिले जात नव्हते कोणत्याही हेतु बद्दल शंका घेतली जात होती. परंतु त्याच्या कामाचा झपाटा त्याचा स्पष्ट वक्तेपणा आणि मेन म्हणजे त्यांचा धाडशी पणा पाहुन विरोधकही थक्क झाल्याशिवाय रहात नव्हते प्रचंड जनसंपर्क ही त्यांची शक्ती आहे. कार्यकर्ते संशोधने त्यांना मार्गदर्शन करणे अडचणीच्या वेळी त्यांना मदत करणे सामाजिक कार्यात त्यांना ताकद देणे वाट चुकलेल्यांना वाटाडे ह्या सर्वच गोष्टींचा त्यांना छंदच आहे. माणुस पारखण्याचे व जोडण्याचे कसब त्यांच्या कडे आहे. त्यांचे कार्य फार मोठे आहे. त्याबद्दल ते स्वत:हुन कधीच कोणाला काही सांगत नाही.

     समाजातील महिलांना पुरूषांच्या बरोबरीने त्यांना अधिकार मिळाले पाहिजेत आत्मसन्मान मिळाला पाहिजे सर्व निर्णयांच्या प्रक्रीयेत महिलांचा सहभाग असला पाहिजे अशी त्यांची महत्वकांक्षा आहे आणि ती असायलाही पाहिजे कारण ते आमचे साहेब आहेत कारण सामाजिक जिवणाचा खोलात जावुन विचार करण्याचा वारसा त्यांना श्री संताजी महाराजांच्या जवळुन मिळालेला आहे.

     वाचन स्मरणशक्ती आणि कामाचा प्रचंड उत्साह या गुणांचे वर्णन शब्दांच्या पलीकडे आहेत. त्यांना वाचणाची आवड पुर्वीपासुनच आहे. ते एक शैलीदार वक्ते आहेत. आपल्याला पटलेला विचार ते उत्तमप्रकारे सर्वांना आपल्या खुबीने पटवून देतात व न पटलेल्या विचारांबद्दल ते मौन बाळगतात. या व्यक्तीमत्वाचा महत्वाचा पैलू म्हणजे त्यांची अनोखी स्मरणशक्ती. त्यांची समरणशक्ती म्हणजे कोणालाही न उलगडलेले कोडं आहे. सतत आधुनिकतेची व प्रगतीची कास धरणारे व समाजासाठी स्वत:ला वाहुन घेणारे ते म्हणजे आमचे साहब होय साहेबच श्री. रामदासजी तडस.

     या सर्व गुणांमुळे व कष्टांमुळे ते फार मोठे होतील व लांब पोहचतिल यात शंकाच नाही. ज्याकाळात शिक्षणाला अनुकुल वातावरण नव्हते किंबहुना परिस्थिती आणि शिक्षण हे विरूद्धार्थी शब्द होते. अशाही परिस्थितीत सर्व संकटावर मात करून पदवी घेऊन सर्वाना बरोबर घेवून जिवणाची यशस्वी वाटचाल चालू ठेवली विलक्षण चमत्कार वाटावा अशा समाजभुषणाची ही गोष्ट आहे. आणि आत्मपर लिखाण आहे हे उघडच आहे. पण संपुर्ण आत्मचरित्र नाही. साहेबांच्या जिवणातील काही सिलेक्टीव्ह मेमरी सारख्या पण मोजक्याच आठवणी असा हा प्रवास आहे. या लेखात संघर्ष हा तीन अक्षरी शब्द फार महत्वाचा आहे. विरोध तडजोड परिस्थीतीचे चढउतार राजकारणात अडथळे हे सर्व जिवणात अनुभवयास आलेल्या व घडलेल्या घटना आहेत. श्रीमंती वैभव, प्रगती ह्या गोष्टीही जिवनात नाही. त्यांच्या आरोग्याच यश हे त्यांच्या रोजच्या धावपळीत आहे. तसेच अनुभव सिद्ध आहार विहार हे त्यांच्या दैनंदीन जिवनात आहे.

     त्यांचे अनुभव सल्ले ते मनमोकळे पणाने देतात. त्यांच्या आतापर्यंत जिवनात समाज बांधवांच्या अडीअडचणी सोडविणे रात्री अपरात्री त्यांच्या   मदतीसाठी धावून जाणे. हे त्यांचे खास वैशिष्ट्ये आहे. त्यासाठी कितीही कष्ट पडले तरी त्याची त्यांनी कधीही पर्वा केली नाही. स्वत:चा एक प्रकारचा वेगळा ठसाच त्यांनी याठिकाणी उमटविला आहे. त्यांचे संघटनात्मक कौशल्य किती अप्रतीम आहे याची प्रचिती आपल्याला आलीच असेल, त्यांचा परखडपणा सच्चेपणा यावरून सिद् होतो त्यांत कधी गर्विष्ट पणाची छटा नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जिवणात अनेक बर्‍या वाईट घटणा घडत असतात. पण काही घटना मात्र त्यांच्या अस्तीत्वाचा ठसा उमटून जातत. त्यांच्या यशातुन अनेकांना स्फुर्ती मिळायला काही हरकत नाही.

     साधेपणा व समतोल वागणे त्यामुळे त्यांनी विविध क्षेत्रात यश मिळविले आहे. आपल्या कामावर व गुणवत्तेवर सर्व कामे व्हावित असे त्यांना वाटते सर्व प्रश्न कल्पकतेने सोडवितात त्याच्यातच साहेबांचा आम्हाला अभिमान वाटतो जी गोष्ट आपल्याला माहित नाही ती जाणुन घेण्याचा मनमोकळेपणा आणि ज्याची आपल्याला खात्री आहे त्याबद्दल आत्मविश्वास ही कामाची सुत्रे वापरून त्यांनी समाजाचा आपल्या कुटूंबाचा व स्वत:चा विकास केला.

     समाजाला अभिमान वाटावा आशी मोठी स्वप्न त्यांनी पाहिली व प्रत्यक्षातही आणली. आयुष्याच्या विविध वाटावरून मार्गक्रमण करताना साहेबांनी जी गती मिळवली ती सर्वांना आदर्श ठरावी अशी वाटचाल आहे. त्यांनी अतुट इच्छाशक्तीच्या जोरावर काय काम मिळविले हे सिद्ध होते.

     अशा ह्या थोर नेत्यास शतश: प्रणाम साहेबांना पुढील आयुष्य सुख समृद्धीचे भरमसाठी चे आणि आरोग्य संपन्न जावो. त्यांना गणेशाची सिद्धी सरस्वतीची बुद्धी चाणक्याची निती, शारदेचे ज्ञान कर्णाचे दान, भिष्माच वचन, रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद आणि समाजातील सर्व व जेष्ठ समाज बांधवांच, भगीनंीचे प्रेम सहकार्य मिळो श्री. संताजी महाराजांचा आशिर्वाद त्यांना मिळो. त्यांच्या आयुष्यातील आनंद गणरायाच्या कानाएवढा विशाल असावा साहेबांचे आयुष्य गणरायाच्या सोंडे एवढे लांब असावे साहेबांच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मोदका प्रमाणे गोड असावा आणि साहेबांच्या वर येणारी संकटे उंदराप्रमाणे छोटे असावीत ह्याच शुभेच्छा आमच्या साहेबांसाठी सर्व समाज बांधवा तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.  

 रमेश सदाशिव भोज
 विश्वस्त तिळवण तेली समाज पुणे
 कार्याध्यक्ष :- प्रांतिक तेली महासभा पुणे जिल्हा
 अध्यक्ष ओबीसी सेवा संघ पुणे जिल्हा. 
 मो. नं. ९६०४७६७०६८

दिनांक 27-03-2015 23:31:25
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in