अहमदनगर - राहुरी तालुका खादी ग्रमोउद्योग संघाची २०१५ -२०२० ची संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध झाली आहे.
विद्यमान अध्यक्ष रमेश पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल तयार करण्यात आले होते. निवडणुक प्रक्रियेत ३० इच्छुकांनी उमेदवारी करण्यासाठी मोर्चे बांधणी केली होती. परंतु शवटच्या क्षणी आवश्यक तेवढेच अर्ज शिल्लक राहिले. निवडणुक निर्णय अधिकारी एस.व्ही. ठोंबरे यांनी बिनविरोध ची घोषणा केली. विद्यमान अध्यक्ष रमेश पन्हाळे, अँड. तात्यासाहेब डोळसे, शिवाजीराव भाकरे, बाळासाहेब पडघलमल, शिवाजी नालकर आझमखान पठाण, जिवय वाघचौरे, गोरक्षनाथ ससाणे, दिलीप ससाणे सौ. बानो हमीद तांबोळी, सौ. पारूबाई गोपिनाथ शिंदे यांचा समावेश बिनविरोधमध्ये आहे या सर्वांचे अभिनंदन, जिल्हा तेली समाज महासभा सचिव सदाशिव पवार, कार्याध्यक्ष, सुधाकर चौधरी, राहुरी तालुका अध्यक्ष, दत्तात्रय सोनवणे राहुरी शहर अध्यक्ष संजय पन्हाळे, आसाराम शेजुळ, नामदेव शेजुळ, संदिप सोनवणे यांनी केले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade