लोणी ता. राहाता येथे संताजी बचत गटाची स्थापना झाली अनेक समाजबांधव उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणात बैठक झाली अनेकांनी आपले विचार मांडले यावेळी उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री सोमनाथराव बनसोडे सर यांनी बचत गटाची आवश्यकता का आहे यावर मार्गदर्शन केले. समाज एकत्र आला पाहीजे एकमेकांच्या विचारांची देवान घेवान होऊन चर्चा होते समस्या सुटण्यास मदत होते एकमेकांना व्यापारात, छोट्या मोठ्या व्यवसायात समाज बांधवांना मदत केली पाहिजेअसे सांगितले . त्याचप्रमाणे भारत दिवटे सर यांनी शालेय साहित्य वाटप, महीला मंडळाने घेतलेल्या मंगळागौर कार्यक्रम, हुशार विद्यार्थि प्रकल्प,व मार्गदर्शन शिबिर, तसेच लोणी येथील तेली समाजबांधव पुस्तिका छपाई असे अनेक विषयावर मा. दिवटे सरांनी चर्चा मासिक मिटिंग मधे घडवुन अाणली. यावेळी बचत गटात सर्वांनी भाग घ्यावा असे आव्हाहन करण्यात आले. तसेच बचत गटामुळे समाजबांधवांचा फायदा होईल, गरजुची अडचण सोडवीण्यास मदत होईल असे उपाध्यक्ष सोमनाथराव बनसोडे सरांनी सांगितले. यावेळी बचत गटासाठी सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन प्रा. भारत दिवटे सर व सोमनाथ बनसोडे सर यांची निवड करण्यात आली. तसेच बचत गटाचे अध्यक्ष म्हणुन धनंजय उर्फ शिवा रमेश दिवटे यांची निवड झाली तर खजिनदार म्हणुन दादासाहेब दिवटे यांची,तर सचिव म्हणुन राहाता तालुका वधुवर सुचक मंडळाचे अध्यक्ष सुधाकर बनसोडे यांची निवड करण्यात आली यासाठी संतोषभैय्या दिवटे यांनी ठराव मांडला तर यास सर्वाच्यावतीने शेजवळ साहेब यांनी अनुमोदन दिले.यावेळी दिलीपशेठ शिंदे,निलेशशेठ दिवटे ,सचिन दिवटे, वसंतराव लोखंडे,पप्पु निकम,प्रसंन्नकुमार धामने,सोनवणे मामा,ओंकार दिवटे ,सुदाम शेजवळ साहेब, प्रकाश शिंदे यांनी विविध विषय मांडले . या सभेसाठी लोणीतील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक उल्लेखनिय सभा झाली. मिटिंग मा. रमेश दिवटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली शेवटि सर्वाचे आभार श्री निलेश दिवटे यांनी मानले