माणुस जोडणारे खा. रामदासजी तडस साहेब

शिवाजी क्षिरसागर,  अध्यक्ष सेवा आघाडी

teli samaj vadhu var melava & ramdas tadas

     माझी सर्व नोकरी पोलिस खात्यात गेलेली अनेक जबाबदार्‍या पेलताना माणुस वाचता आला, माणुस समजला. माझा समाज तेली, मी एक तेली ही भावना जीवनभर जपलेली. या वाटेवर तेली महासभा भेटली, मा. खासदार तडस साहेब भेटले. रामदासजी हे एक पैलवान पैलवान हे जरा तापट आसतात. पण विदर्भ केसरी असलेले हे बांधव अतिशय शांत स्वभावाचे मला त्यांच्या जवळ वावरता आले व काम ही करता येते हे त्यांचे वैशिष्ठ.

     कार्यकर्ता घडवणारे घडलेला कार्यकर्ता कार्यमग्न ठेवणे. घडलेल्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवणे घडलेला कार्यकर्ता विश्वास पात्र आहे का हे ओळख. ही तडस साहेबांची प्रणाली. त्यांच्या पोथडीत असंख्य कार्यकर्त्यांचा भारणा ते प्रत्येकाला आपला मानता. प्रत्येकावर जबाबदारी टाकतात ते प्रत्येकाच्या सामाजीक स्थाना बरोबर अर्थीक परिस्थीचा आढावा घेतात. कार्यकर्ता घर संभाळुन कार्य करतो. त्याच्या कार्यामुळे घराला आर्थीक झळ बसु नये याची ते जाणीव ठेवतात. मग आशा कार्यकर्त्याला आपल्या कोट्यातील रेल्वे प्रवासाची सवलत, जागो जागी असलेल्या विश्राम गृहातील मुक्कामाची सोय करू शकतात. तशी अधीकृत पत्रे ही देतात. परंतु  या सवलतींचा लाभ समाज कामासाठी गरज पडली तर केला जातो की स्वत:च्या मतलबा साठी केला जातो. याचा ही आढावा घेतात फसवेगीरी करणार्‍याला पुन्हा संधी नाही प्रमाणीक पणाला पहिली पसंती ही त्यांच्या कार्याची खरी प्रणाली मला अनुभवता आली. ती विसरता येणार नाही.

     कोणतीही संघटना लहान आसते तेंव्हा कार्यकर्ते ही कमी आसता ना मते कमी असतात स्पर्धा कमी आसते पण जेंव्हा तडस साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढला संघटनेला बाळसे आले. काम करण्यास बांधव भेटत नव्हता तेथे रांगा लागल्या मग यातून स्पर्धा आली या स्पर्धेत कामाची स्पर्धा त्यांनी सुरू केले. कधी कधी स्थानीक मतभेदातुन कार्यकर्त्यांवर आरोप होत तेंव्हा तडस साहेब काळजी पुर्वक एैकतात. दोन्ही कडून सत्य समजुन घेतात व योग्य पाऊले उचलतात. कोण म्हणतो म्हणुन कुणाला नेमू नका कोण म्हणतो म्हणुन कोणाला हाटवू नका हे त्यांचे आग्रही मत आसते. त्या मताला ते किंमत देतात मी. महाराष्ट्र तेली  महासभेत सक्रीय झालो मला सेवा करावयाची होती पद नको होते मी रत्नागीरी, सिंधुदुर्ग गोवाच्या परिसरात तेली महासभा घेऊन गेलो ते संघटन बनवले ते अधीक मजबुत करण्यासाठी तडस साहेब त्या डोंबर दर्‍यात स्वत: आले व त्या डोंगरातील बांधवांना संघटीत करन परत आले.

     मी सेवा निवृत्त होताच माझ्या साठी तेली महा सभे अंतर्गत सेवा त्यांनी निर्माण केली या सेवा आघाडीची अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिली. मी ती जबाबदारी पैलू शकतो व पेलली ही त्यांनी अनुभवले कधी घरगुती अडचनी कधी शाररीक अडचनी यामुळे दिरंगाई सुरू झाली. मी व काही बांधवांनी सांगीतले आता खांदा दुखतोय खांदा बदलू पण या बदलाला त्यांनी नकार दिला आणि काम करा हा सल्ला दिला कार्यकर्त्यांना समजुन घेऊन चालणारे हे नेतृत्व अधीक गतीमान होवू ही हार्दिक शुभेच्छा.

दिनांक 28-03-2015 01:21:37
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in