भाजपा, खासदार रामदास तडस व तेली समाज भाग 1 - श्री. मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
आज सत्तेत गेलेल्या भाजपा या राजकीय पक्षाचा व त्यांच्या मातृसंस्था चा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तेली समाजाचा संबंध काय ? हे आपण समजावून घेतले तरच आपल्याला आपले काय बरोबर काय चुकले याचा रस्ता सापडला आहे. स्वातंत्र्य मिळण्यासाठी हजारो तेली बांधव संसारावर तुळशीपत्र ठेवून लढत होते. त्यातीलच हजारो तुरुंगातही गेले. यातील काही शारीरिक द्रष्ट्या अपंग झाले, काही हुतात्मा झाले. यात काही स्त्रियाही होत्या. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पत्री सरकारमध्ये स्वातंत्र्यवीर रामचंद्र विभुते उजवे हात होते. स्वातंत्र्यात मिळाले काय ? तर मत देण्याचा अधिकार मलाच मत नाहीतर परिणामाला सामोरे जा. ही स्वातंत्र्यसैनिकांची अवस्था तर सामन्यांची काय असणार ? सत्तेत गेली मराठा जात कोकण सोडून अस्तित्वात असलेली. कुणबी जात मराठ्यांपेक्षा हिन ठरवली असली तरी सत्तेत मराठा समाज व कुणबी समाज एकत्रित होता यातून तेली जात भरडली जात होती. विदर्भासारख्या ठिकाणी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 20 ते 40 टक्के मतदार असताना फक्त एकच खासदार व त्यांना काही वर्षे राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचा उपयोग करुन मतदार संघातून नरसिंह राव ते गुलाब नबी आझाद परप्रांतीय असूनही काँग्रेस प्रेमापोटी निवडून दिले. समाजाला काय मिळाले तर एक फार मोठा भोपळा कोणतेही मत मराठा व काँग्रेस विरोधात गेली नंतर दडपशाही.