भाजपा, खासदार रामदास तडस व तेली समाज भाग 2 - श्री. मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तेली हे याबद्दल सोशल मीडियावर काही पोरांनी काही मते व्यक्त केली. याही बाबी आपण बाजूला ठेवू. आपण एवढ्या बाबींवर लक्ष केंद्रित करू. निवडणुकीपूर्वी मोदी बंधूंनी नंदुरबार येथे मिटींग घेउन समाजाला आव्हान केले समाजाचे सहकार्य हवे आहे. हे भाजपाचे नविन नाते मानू लागली पण याही पुढे मांडत आहे. आपल्या बहुजन या मुखवट्याआड काँग्रेसने मराठा जन प्रणाली राबवली या तेली माळी वंजारी धनगर यांना दहशतीत ठेवले होते. बंजारा समाजाला मुख्यमंत्रीपद देऊन विकास मराठा समाजाचा केला. ही चीड भाजपाला आपले म्हणणार्यांना झाली ही वस्तुस्थिती प्रथम विसरता येणार नाही. पण हेही विसरता येणार नाही की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या भाजपाच्या मातृ संस्थेत तेली होता. देऊळगाव राजा येथील व्यवहारे ते पूर्ण घर स्वातंत्र्यापूर्वीपासून आजही संघाशी बांधील आहे. आजचे व्यवहारे बंधू स्वातंत्र्याच्या दरम्यान जन्मले पण त्यांच्या मनावर पाळण्यातच संघाचे संस्कार झाले ही वस्तुस्थिती आहे. बेलापूर (नगर) शास्त्री साळंखे, शेगाव नगर येथील कै. विष्णुपंत देहाडराय विदर्भातील बर्याच तेली बांधवांनी संघशाखेत जाऊन संघाला अभिप्रेत असलेली सामाजिक व राजकीय जोडणी केली आहे नाशिकचे श्री सदाभाऊ वालझाडे व नगर येथील श्री नाना जाधव यांनी संघाचे काम एक व्रत म्हणून स्वीकारले आहे. श्री. नाना जाधव संघाच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. मोदींचे बंधू महाराष्ट्रात येऊन आपण सोबत देण्यापूर्वी कुठेतरी बैठक होती त्यामुळे काँग्रेस (मराठा) पासून तेली समाज भाजपाकडे वळाला हे विसरता येत नाही. नागपूरच्या भूमीत रेशीम बाग कडे समाजाची पाऊले होती. त्यांचे जिवंत उदाहरण म्हणजे कृष्णा खोपडे होत. विदर्भातील बहुसंख्य परीसरात तेली या पुर्वी ही संघ शाखेत होता. उमरेड येथे एक जुना पुराना वाडा आहे. आपली एैतिहासिक खुना आज ही वास्तू जपून आहे. याच वास्तूत 1920 पासून ज्या रचनात्मक देशात वाटचाल झाली जी खलबते झाली ती या वास्तूच्या भींती आज ही जिवंत पणे जपून आहेत. कारण ही एैतिहासीक वास्तू एका तेली बांधवांची आहे. एक लाट आली आणी त्या लाटेवर तेली समाज स्वार झाला असे मात्र नव्हे. ही वस्तुस्थिती प्रथम समजून घेतली पाहिजे