भाजपा, खासदार रामदास तडस व तेली समाज भाग 3 - श्री. मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
विदर्भ हा परिसर मध्यप्रदेशात असताना तेली समाजाला योग्य प्रतिनिधित्व होते. सत्ताकारणात समाज होता. परंतू संयुक्त महाराष्ट्र अस्तीवात आल्या नंतर समाजावर अन्यायच झाला होता. हे सुरूवातीस स्पष्ट केले आहे. गत पाच वर्षात भाजपाने फक्त तीन आमदार व एक महामंडळ सदस्य व एकमंत्री व एक खासदार या पेक्षा काहींच दिले नाही. आमच्या समाजाची मागनी. मुळात आमच्या लोकसंखेच्या प्रमाणात दहा टक्के वाटा सत्ता कारणात पाहिजेच. या साठी खा. तडस साहेबांनी समाज जागृती केली आहे. आम्ही भाजपाला सोबत देतो, दिली व देणार ही आहे. तेंव्हा पूर्वी जसे समाजाचे तिन खासदार होते तद्वत केंद्रीय मंत्रीमंडळात तेली समाजाचे मंत्री ही होते. हा दोन दशका पुर्वीचा इतिहास आहे. आम्हाला केंद्रीय मंत्रीमंडळात संधी हवी आहे. विदर्भात तेली असलेल्या मतदार संघात समाजाला खासदार की साठी संधी मिळावी ही समाज मनाची हाक आहे. तेली एक गठ्ठा मत हे भाजपाला मिळणार आहे. कारण खा. रामदास तडस यांनी दहा टक्के लोकसंख्या असलेल्या समाजाचे संघटन स्वत:ची वडीलोपार्जीत शेतजमीन विकून केले आहे. स्वत:च्या डोक्यावर कर्जाचे डोंगर घेऊन त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. गेली तिन दशके या साठी मेहनत घेतली आहे. कष्टाचे, या त्यागाचे आज यशात रूपांतर होण्याची वेळ आली आहे.