संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व तेली समाजातील मार्गदर्शक सोमनाथ बनसोडे (रा. दाढ बु.) यांची पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या तेली समाजाचे तिर्थ श्रीक्षेत्र संत संताजी महाराज देवस्थान समितीच्या कार्यकारिणी सदस्यपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. शिक्षक सोमनाथ बनसोडे हे उत्तर नगर जिल्ह्यामध्ये अनेक समाजपयोगी उपक्रम राबवन समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत आहेत. ते तरुणासाठी व्यवसाय मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मदत व शैक्षणिक साहित्य वाटप अशी विविध सामाजिक कामे करत आहेत. बनसोडे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची दखल घेऊन संत संताजी महाराज देवस्थान समितीच्या कार्यकारिणी सदस्यपदी त्यांची बैठकीदरम्यान निवड करण्यात आली. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष देवीदास उबाळे, नाशिकचे उपाध्यक्ष सुधाकर कवाडे, नगरचे विजय काळे, ज्ञानेश्वर राऊत, दिलीप अंबेकर व महाराष्ट्रातील अनेक तेली समाजबांधव यावेळी उपस्थित होते. शिक्षक सोमनाथ बनसोडे यांच्या निवडीबद्दल नगर जिल्ह्यातील तेली समाज बांधवांबरोबरच आश्वी व दाढ परिसरातूनही त्यांचे अभिनंदन होत आहे.