चंद्रकांत वाव्हळ, जिल्हा अध्यक्ष पुणे पश्चिम
लहान पणा पासुन पहातोय समाज म्हणजे काय तर मोठ्या गावात किमान शंभर घरे खेडोपाड्यात तीन घरे. भाकरीचा सुर्य रोजघरात उगवला पाहिजे आणि हा भाकरीचा सुर्य घरात आणन्या साठी हाळीपाटी बाजार हाट, मोल मजुरी यात गुंतून भाकरीचा सुर्य घरात आणने हा असला सुर्य जेंव्हा घरात आणला जायचा तेंव्हा ते अंधारले घर त्या सुर्यने चकचीत होयचे. शक्ती मिळायची. ती तेवढ्या पुरती पण सर्व अंधारच नष्ट करण्याचा सुर्य समाजात उगवत नव्हता. आणि उगवेल का याची शंका होती. धनदांडग्या व जात दांडग्यांच्या घराच्या वळचनीला उभे रहाणे ही गावकीची ठेवण ती मोडेल त्याला चारही दिशा मोकळ्या उचल तेल्या लाठ दुसरे गाव गाठ ही करडी नजर समाजाला पोळत होती.
असा हा भयान काळ विदर्भात तेली बहुसंख्येने तेथे ही आशीच अवस्था पण या पेक्षा अवस्था पुणे जिल्ह्यात तिकडे संघटन तरी होते. इकडे त्याचा मागमुस ही नव्हता काहिनी समाजाचा कळवळा घेऊन काही करू पाहिले पण काही करीताना विश्वास हवा तो त्यांच्याकडे नव्हता. शेवट काय तर समाजाच्या व त्यांच्या हातावर जळते निखारे आले. आशी सर्व अवस्था. आशा वातावरणात तेली महासभेने म्हणजे तडस साहेबांनी माझी नेमणूक केली. मी इतरत्र सर्व समाजाबरोबर गाव पातळीवर काम केलेले माणसे जोडण्याची कला होती. हा माझ्यातील गुण साहेबांनी उचलला. प्रत्यक्ष समाज संघटीत करीताना अनेक प्रश्न समोर येत. आशा वेळी तडस साहेबांना विचारना केली. परंतु त्यांनी प्रश्न क्षणात सोडवून दिले. समाज संघटनेला संघटीत करीताना ते अनेक विचार सभेत उभे रहात. तेंव्हा ती सभा कार्यकर्ता प्रशिक्षण सभा कधी झाली हे समजत नसे. ते कार्यकर्त्यांना दिशा, उमेद, जिद्द प्रेरणा देऊन जातात. यातुनच कार्यकर्ता घडत आसे. यातुन तो समाज संघटीत करू लागतो. खेडो पाड्यातील अडवळणावरील समाजाच्या घरात तो जावुन त्या घराला आपले कारणारी किमया आम्हा सर्व कार्यकर्त्यांना तडस साहेबांनी दिली.
समाजाच्या मतावर धनदांडगे व जातदांडगे मोठे होतात ते निवडणूकी नंतर समाज हिताचा निर्णय घेत नाहीत. उलट समाजाला मत भेदात ठेवून गुंतवत ठेवतात ही खरी आपल्या मागासलेपणाची पाळेमुळे. ही नष्ट करण्याचा विडा तडस साहेबांनी उचलला देवळी नगर पालीकेचे नगर सेवक नगराध्यक्ष १२ वर्षे आमदार व आज खासदार ही वाट त्यांनी निर्माण केली. होय मी तेली आहे. आणि मी तेली म्हणुन निवडणुक रिंगणात आहे मी जिंकणार ते तेली म्हणुन मी झटणारा तेली समाजासाठी ही जिद्द त्यांनी निर्माण केली. ही जिद्द त्यांनी आम्हा सर्वांना दिली. समाज कारण राजकारण या सर्व वाटचालीत त्यांनी एक खंबीर पणा दाखवला. एक संघटक पणा दाखवला या आदर्शापासुन अनेक कार्यकर्ते घडले. या कार्यकर्त्या पासुन त्यांनी प्रबोधनात्मक कार्य करून घेतले. आज समाज मरगळ झटकून जो उभा आहे. ती मरगळ झटकण्यासाठी तडस साहेबांची गेली १५ वर्ष जी मेहनत घेतली तीच फक्त कारण आहे. ते सतत महाराष्ट्रातील सामाजीक मेळावा वधु-वर मेळावे या निमित्ताने जातात. आगदी छोटा कार्यक्रम आसेना पण हजेरी लावतात यातुन समाज मनाला चेतना देतात महाराष्ट्र पिंजुन काढताना येणारा प्रवास खर्च ते स्वत: करतात मुक्काम व जेवणाचा त्रास ही अयोजकला देत नाहीत. हे पदर मोड करून करणे आपला वेळ देणे. वर्द्या ते रत्नागीरी हा प्रवास कार्यक्रमासह ३/४ दिवसाचा असेल पण तरी ते तेथे जावून समाजाला संघटीत करतात.
समाजाला विचाराचा सुर्य त्यांनी प्रत्येक ठिकाणी पोहच केला. त्यांना पुणे जिल्हा तेली महासभा प. तर्फे सर्व सहकार्य सोबत्या तर्फे सर्व बांधवा तर्फे हार्दीक शुभेच्छा.