सौ. मंगल जाधव महिला आघाडी महाराष्ट्र
मला आठवतो त्यांचा दोन वर्षापुर्वीचा वाढदिवस त्यांनी त्यांच्या गावी वर्धाजवळ, ठेवला होता त्या निमित्त प्रांतिक महासभेची मिटींग व त्यांच्या गावात सामाजिक कार्यक्रम अयोजित केला होता खुप चोख व्यवस्था केली होती.
मेहनत सचोटी व माणुसकी हे गुण त्यांच्या त्या दिवसभराच्या कार्यक्रमात दिसुन आले ही त्यांची तत्व त्यांच्या यशाच बळ आहे.
साधी रहाणी सखोल बुद्धी अन कमी पडल्यास चुक कोठे झाली हे शोधुन अपार कष्ट करून यश संपादन करणे हा त्यांचा सदगुण आहे ते मित भाषी आहेत पण बोलून न दाखवता करून दाखवणे ह्या गुणामुळे ते आता पर्यंत नगराध्यक्ष कारभार संभाळून येथ पर्यंत आलेत.
त्यांनीच दोनदा विदर्भ केसरी विजयश्री प्राप्त केला आहे.
मला आठवते की आम्ही त्यांच्या घरून पुण्याला यायला निघालो तेव्हा रामदासजीच्या सुविद्य पत्नी शोभाताई यांनी आम्हाला मस्त विर्दभाची खासियत असलेला चमचमित पदार्थाचा डबा रात्री रेल्वेत जेवनासाठी नको नको म्हणत असताना करून दिला. त्या वरूनच कळते एका यशस्वी पुरूषाच्या मागे एका स्त्रीची साथ असते.
शोभाताईंना सार्थ अभिमान आहे आपल्या पती बद्दल त्या भेटल्या की रामदासजीच्या कार्याच तर कौतुक करतातच. आज शोभाताई राजकारणात जे सक्रिय कार्य करतात त्याच श्रेय पण रामदासजी ना त्या देतात.
घरच्या सार्या जबाबदार्या सांभाळुन शोभाताई तडस साहेबांबरोबर दौर्यावर असतात ताई सुद्धा दोनदा नगर अध्यक्षा म्हणुन निवडून आल्या अन त्यांच म्हणुन पतीची साथ ते माझ्या पाठीशी आहेत म्हणुनच मी इतक सारे करू शकले.
या दोघांच कार्य खुप वाखण्या सारखे आहे. ईश्वर चरणी प्रार्थना की या दोघांना दिर्घ आयुष्य मिळो. निरोगी आयुष्य मिळो अन यांच्या कडून चांगल्यात चांगले समाज कार्य होवो
अन पुन्हा एकदा रामदास तडस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सौ. मंगल जाधव महिला आघाडी महाराष्ट्र