प्रकाश लोखंडे, अ. नगर
स्वातंत्र्यात रूळल्या नंतर मोठ्या शहरात किंवा जास्ती जास्त जिल्हा स्तरावर समाज संघटना आकाराला येऊ लागल्या या संघटना कितीही एकजीव केल्या तरी स्थानीक मतात बर्याच अडकून पडल्या मान आपमान हे आडसर निर्माण होत होते. आशा वेळी समाज माता कै. केशरकाकु खासदार होत्या. मी तेली आहे याची जाणीव त्यांना होती. महाराष्ट्र तैलिक महासभेच्या त्या अध्यक्षा होत्या. विदर्भात रूजलेली व मराठवाड्यात मुळ धरलेली ही तैलिक होती. मी स्वत: काकुंच्या संपर्कात होतो. संभाजी रायपुरे हे काकुुंच्या बरोबर काम करीत होते. रायपुरे व मी विचार करू लागलो देशपातळीवर तैलीक महासभे बरोबर आपण संलग्न आहेत परंतु समाज विश्वास निर्माण होण्यास ही संघटना रजीस्ट्रर पाहिजे. काकूंच्या मार्गदर्शनातुन दिशा मिळाली औरंगाबाद येथील न्यायधीश शेलार यांचे चिरंजीव संजय शेलार यांच्याकडे घटना बनविण्याचे काम दिले. अखील भारतीय तैलिक महासभा अध्यक्ष पद काकुकडे येणार हे निश्चीत झाले. काकु व रायपुरे यांनी तैलिक महासभेची मिटींग नगर येथे घेण्याची विनंती केली. त्या विनंती प्रमाणे नगर येथील समाज बाधवांना सोबत घेऊन तशी सहविचार सभा नगर येथील मुकुंद मंगल कार्यालयात आयोजन केले.
या वेळी देश पातळीवरील तैलिक महासभेची सह विचार सभा सुरू झाली या सभेला महाराष्ट्रा सह देश पातळीवरील समाज बांधव प्रथमच नगर येथे आले होते. सभेची सुरूवात झाल्या नंतर देश पातळीवर अध्यक्षांची निवड सुरू झाली. या वेळी सर्वानुमते कै. केशर काकुची निवड अध्यक्षा म्हणुन झाली. भोजना नंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांची निवड करावयाची होती. काकू, रायपुरे यांनी माझ्या सह एक दोन जना बरोबर चर्चा केली. असंघटीत समाजाला संघटीत करू शकणारा संघटक वृत्तीचा अध्यक्ष हवा आसे सुजान बांधव आमदार रामदास तडस यांच्या शिवाय कोणच नव्हते. आणि या सह विचार सभेत सर्वा समोर हा विषय ठेवला आसता सभेने एक मताने मा. रादास तडस यांची निवड महाराष्ट्राच्या अध्यक्ष पदी केली. या वेळी मा. सौ. प्रिया महिंद्रे, कै. नंदु क्षिरसागर, श्री. अशोक काका व्यवहारे, श्री. अंबादास शिंदे व इतर मान्यवर उपस्थीत होते. त्या वेळचा काळ असा होता की अपन संघटीत पणे एकत्र येऊ, काही तरी हलचाल करू ही कल्पनाच हास्यापद होती. समाज मनाला संघटन व संघटना हा स्पर्श शेकडो मैल दूर होता. हे आव्हन नगरच्या सभेत निवड झाल्या आ. रामदास तडस यांनी स्विकारले.
याच सह विचार सभेत महाराष्ट्र पातळीवर माझ्याकडे उपाध्यक्ष पद देण्यात आले. संस्था रजिस्टर करणे, किमान जिल्हा व तालुक्या पर्यंत संघटनेचे रोपटे लावणे हे प्रथम उदिष्ट आम्हा समोर तडस साहेबांची ठेवले. स्वत:ला सुशिक्षित म्हणनारे काही मी तेली हे कबुल करीत नव्हते जे कबुल करीत ते समाजाचे काम करण्यास तयार नसत. आशा वेळी तडस साहेबांनी त्यांना समजुतीच्या त्यागाच्या, जिद्दीच्या, भविष्याच्या काही गोष्टी सांगीतल्या. यातून कार्यकर्ते घडू लागले जिल्हा पातळीवर मेळावे घेण्यास सुरूवात झाली मी नगर व जिल्हा पातळीवर मेळावे घेण्यास सुरू केले आपला समाज बांधव जास्ती जास्त ग्रामपंचायत सदस्य कसा तरी होत आसे. इतर अधीकार पदे आपली नाहीत आपल्या साठी ती नाहीत लोकशाहीतील ठोकशाहीने पळवलीत पण या ठोकशाहीला विदर्भ केसरी लोळवतो व तेली मतावर, तेली ताकदीवर, तेली संघटनेच्या बळावर आमदार होतो ही वास्तवता त्यांना प्रत्यक्ष मेळाव्यातून मिळू लागली. मरगळलेल्या मनाल उभारी देऊ लागली संघटन व समाज ताकद काय आसते याचे खडे बोल तडस साहेब जेंव्हा खेडो पाड्यातील बांधवांना सांगत तेंव्हा हे बांधव मी ही एक तेली आहे. आसे असंख्य एक एक तेली आता एकत्र येऊ शकतात आणि नवा इतिहास घडवू शकतात ही जाणीव आगदी सुरूवातीच्या संघटनेच्या प्रवासात तडस साहेबांनीह रूजवली. समाजाच्या मनावर ही भावना रूजवण्यासाठी मा. तडस साहेबांच्या बरोबर काम करू शकलो. यांचे मला समाधान वाटते.
मी घरातील अडचनी शारीरीक अडचनी यामुळे पहिल्या सारखा आज सक्रिय नसलो तरी. महाराष्ट्रात संघटनेचे रोपटे रूजवण्यात माझा नगर जिल्हा व मी आघाडीवर होतो. याचे समाधान आम्हा सर्वांना आहे. विस्कळीत असंघटीत मतभेद अडकलेला समाज संघटन करणे जेवढे आवघड होते. आहे तेवढेच ते टिकवणे आवघड होते परंतू पैलवान प्रकृतीच्या खासदार तडस साहेबांनी शक्य केले आहे. हा समाजाला गौरव शाली रस्ता बनविण्यात त्यांनी काटे वेचलेत पायात मोडलेले काटे स्वत:च्या हातानी काढून रस्ता काटे विरहित केला. या रस्त्याचा महामार्ग व्हावा यासाठी त्यांनी महाराष्ट्र पिंजुन काढला व तो त्यांनी आज बनवला ही आहे. त्यांना माझ्या कुटूंबीयाच्या वतीने नगर शहर वाशीयांच्या वतीने हार्दीक शुभेच्छा.