राजश्री भगत, अध्यक्षा अखील भारतीय म. प्र. व अल्पबचत महासंघ
श्रीमान रामदासजी तडस आपल्या समाजाला अभिमान वाटावा अस व्यक्तीमत्व ! आमदार असताना श्री. प्रकाश लोखंडे यांच्या मुलीच्या विवाह प्रसंगी नगर येथे ओळख झाली होती. नंतर बरीच वर्षे काही प्रसंग आलेच नाही की पुन्हा भेट होईल म्हणुन नंतर वर्धा मतदार संघातून खासदार म्हणुन रामदासजी निवडून आल्यानंतर तर इतका आनंद झाला की अरे आपल्या माहेरचा माणुस कारण बाई कितीही म्हातारी झाली तरी तिला माहेरचा अभिमान आणि कौतुक असतच मंगल जाधव व माझी मैत्रीण बनुन लगेच फोन नं. घेवून फोन लावला व अभिनंदन केल. त्यांनीही कैतुकाने स्विकारलं.
दिल्ली अल्पबचतीच्या कामासाठी नेहमी जावं लागलं त्यामुळे खासदारा मार्फत रहायची सोय झाली तर बरेच म्हणून आमचे प्रयत्न असतो. म्हणुन रामदासजींना फोन करून विचारल तर त्यांनी काहीही आढेवेढे न घेता महाराष्ट्र भवन मध्ये २ दिवस रहायची व्यवस्था केली. जानेवारी २०१५ मध्ये वर्धाला जाण्याचा प्रसंग आला. घरच्या कारने निघाल्याने देवळी वरून जायचे होते. रामदासजी भेटले तर भेट घ्यावी म्हणुन त्यांच्या घरी गेलो तर चहा पोहे घेतल्याशिवाय साहेबांनी आम्हाला सोडले नाही. अशा व्यक्तीची ओळख शान वाढवून जाते. १ एप्रिल त्यांचा वाढदिवस आहे. हे सुद्धा गावकुसचे संपादक व माझे स्नेही श्री. मोहन देशमाने यांच्याकडून समजले व रामदासजी तडस यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करावे म्हणुन फोन वरच बोलणे झाले. माझ्या भावना कुठल्या शब्दात व्यक्त करू. हेच कळेनांसे झाले.
तुका आभाळा ऐवढा वर्धा जिल्ह्यासारख्या छोट्या जिल्ह्यातुन आमच्या समाजाचा माणुस दिल्लीच्या तख्तावर खासदार म्हणुन विराजमान झाल्याचा संपुर्ण समाजाला अभिमान आहे. त्याच्या उज्वल भवितव्यसाठी व दिर्घायुष्यासाठी मी देवाजवळ प्रार्थना करते. व अखिल भारतीय महिला प्रधान व अल्पगचत प्रतिनिधी महासंघाची अध्यक्षा या नात्याने संपुर्ण प्रतिनिधी महासंघाची अध्यक्षा या नात्याने संपुर्ण भारतातील ५ लक्ष अल्पबचत एजंटातर्फे त्यांचं अभिष्ठ चिंतन करते.