श्री. विजय रत्नपारखी, विभागीय अध्यक्ष, प्रांतिक तेली समाज महासभा
मा. रामदास तडस साहेब, हे तेली समाजातील तळागाळातील घटकांसाठी काम करणारे खासदार. तडस साहेबांनी आयुष्यात अनेक खाचगळगे पार पाडत राजकारणात आपला ठसा उमटविला आहे. वर्धा जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रभर त्यांनी आपल्या कार्याचा इतिहास रचला आहे. त्यांनी अनेक अडचणींचा सामना करत खासदारकी हाशील केली आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक समाजबांधवांची कामे आगदी घरातील व्यक्तीप्रमाणे केली आहेत. आज वर्धा मतदारसंघातील धनदांडग्यांच्या विरोधात उभे राहून आपल्या समारजाच्या ताकदीवर प्रचंड मताधिक्याने खासदार म्हणून ते निवडून आले आहेत. महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे ते प्रदेशाध्यक्ष म्हणूनही कार्य करत आहेत. प्रांतिकच्या माध्यमातुनही ते संपुर्ण महाराष्ट्रभर समाजबांधवांशी आपुलकीचे नाते जपत आहेत. त्यांनी समाजातील व्यक्तींबाबत कधीही भेदभाव केला नाही. सर्वांना आपले समजून कार्य करीत आहेत. अनेक संघर्ष त्यांनी केले आहेत. आज समाजाचे कार्य करत असताना प्रांतिकच्या माध्यमातून घराघरांत पोहोचले आहे. माझ्या वैयक्तिक जीवनातही त्यांचे चांगले सहकार्य लाभले आहे. समाजातील कोणतीही व्यक्ती त्यांच्याकडे कुठले काम घेऊन गेली तर त्यांनी त्यांची आपुलकीने ते विचारपूस करतात.
राजकारणामध्ये इतर लॉबीमुळे किती सर्ंघष करावा लागतो, ते नेहमी सांगत आसतात. पण त्यांनी या लॉबीशी लढा देऊन आपले कार्य सिद्ध करून दाखविले. समाजासाठी काहीतरी करावे, समाजातील तरूण पिढीला नेहमी संदेश देतात, की तरूणांनो, संघटित व्हा, चांगले शिक्षण घ्या. चांगल्या हुद्यावर नोकरी करा. व्यवसाय करा. कोणीही मागे पडू नये. असे नेहमीच ते मार्गर्दशन करतात समाजासाठी तळमळ असणारे तडस साहेब नेहमी आमच्यासारख्या तरूणांना मार्गदर्शन करत असतात. समाजानेही अशा आपल्या नेत्यांना साथ द्यावी., त्यामुळे समाजाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. तडस साहेब कधीही समाजातील व्यक्तींचा भेदभाव करत नाहीत. सर्वांशी ते अगदी सलोख्याने विचारपूस करून त्यांच्याशी आपले नाते घट्ट करीत आहेत.
तरी अशा व्यक्तिमत्त्वाला शतश: प्रणाम त्यांना उदंड आयुष्य लाभावे, ही ईश्वचरणी प्रार्थना !