श्री. रामदास धोत्रे, उपाध्यक्ष महाराष्ट्र तेली महासभा
बांधकाम क्षेत्रातील उच्च पदवी संपादन केल्या नंतर मला समाज जानवु लागला तो मला हाका मारत होता. परंतु मी माझे घर निट उभारू शकत नसेल तर समाजाला काय देणार. हा प्रश्न सबंधीताशी चर्चेतुन सोडवून. बांधकाम क्षेत्रात उमेदवारी करू लागलो. वेळ मिळताच समाजाचा एक साधा घटक म्हणुन वावरू लागलो परिवर्तन झाले पाहिजे या परिवर्तनासाठी उभा राहिलो माझे उच्च शिक्षित ज्ञान व अनुभव जमेस होते. यातुन पुणे शहरातुन कार्यकर्त्यांुची फळी निर्माण करून वाटचाल सुरू केली. महाराष्ट्रात नियुक्ती करून कधी दबावाने, कधी दादागीरीने, कधी बळे बळेच समाजाचे अध्यक्ष होता येते. परंतु अगदी पुर्ण लोकशाही पद्धतीने अध्यक्ष व विश्वस्त हे पुणे तिळवण तेली समाजाचे होता येते. या परंपरेला शोभेल अशी निवडणूक होऊन मी समाजाचा अध्यक्ष झालो माझा सबंध मा. रामदास तडस साहेब बरोबर आला. महाराष्ट्र तेली महासभा ही समाजाची संघटना आहे याची जाणीव प्रथम झाली. कारण सभवती त्यांची कुठे तरी पुसट ठेवण होती. मा. तडस साहेबांनी मला बोलावून सांगितले आता प. महाराष्ट्र पाच जिल्ह्यांचा यात समाावेश मी उभा राहिलो प्रत्येक ठिकाणी जावून कार्यकर्ते हेरले त्यांना जागे केले. तडस साहेबांना बोलावून सह विचार सभा घेतल्या या नंतर काय ?
मा. केशारकाकु क्षिरसागर पुण्यात येत तेंव्हा त्यांच्याशी चर्चा करून अनेक प्रश्न सोडवत होतो. समाजा बरोबरचे प्रश्न यांचा मागोवा घेत होतो. मा. जयदत्त क्षिरसागर मा. रामदासजी तडस यांच्या बरोबर मुंबई व इतर ठिकाणी भेटी होत तेंव्हा तेली ताकद व तेली प्रश्न समोर येत आशा वेळी समाजाचा एक न भुतो आसा मेळावा निश्चित झाला. मेळाव्याचे ठिकाण सुदुंबरे हे ठरले अतिरेकी व्यवस्थेच्या विरोधात उभे राहून संत तुकारामांच्या विरोधातील कायदे पायदळी तुडवणारे महान संत संताजी यांच्या समाधी स्थळी सुदूंबरे हे जसे समाधी स्थळ आहे तसेच नजीकच्या देहू याच देहूत संत संताजींनी धन दांडग्या व जात दांडग्यांना तेली ताकद दाखवली. सुदुंबरे येथे महामेळावा निश्चित झाल्या नंतर केशरकांकुचे आशिर्वाद जयदत्त अण्णांचे मार्गदर्शन व तडस साहेबांचे नियोजन हे आम्हा पुणे शहर ग्रामिण बांधवांना आयोजक म्हणुन उपयोगी पडले. हा मेळावा म्हणजे आम्हा सर्व पुणेकरांना अव्हान होते हे पेलताना अनेक अडचनी आल्या परंतु त्या पार पाडतात तडस साहेबांनी जी सोबत दिली त्याचे फळ म्हणजे आयोजक म्हणुन न भुतो असा हा मेळावा.
हा मेळावा म्हणजेसमाजाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड समाज कुठून कुठे पर्यंत प्रगती करीत आला त्याच्या इतिहासाचा ठेवा. हा मेळावा समाजातील अनेक तट, वेग वेगळ्या राजकीय पक्षातील बांधवांचे एकत्री करण होते. हे एकत्री करण तडस साहेबांची केले. हा खरा त्यांच्या संघटनेचा अनुभव आहे. मला त्यांच्या खांंद्याला खांदा लावून लढताना सर्व अनुभवता व शिकता आले हे मी माझे भाग्य समजतो. या नंतरचा नागपूरचा मेळावा या साठी सुद्धा त्यांनी आपले कौशल्य पणास लावले परंतु या दोन्ही मेळाव्यातून एक झाले. महाराष्ट्राच्या राजकारणी मंडळीला तेली ताकदीची जाणवी झाली भविष्यात तडस व जयदत्त क्षिरसागर जर असेच संघटन करू लागले तर स्वबळावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तेली होऊ शकतो. यातुन रस्ते आडवले. रस्ता आडवणे हा तुमचा हाक्क आहे. तो जरूर बजवा परंतू ते तोडून, फोडून पुढे जाणे ही आमची नवी परंपरा आहे. निराश न होता. न थांबता न डगमगता तेलीपण दडवून ठेवता. तडस साहेब महाराष्ट्र पिंजुन काढत होते. जात दांडग्यांनी दगा दिला म्हणुन ते दुसर्या पक्षात गेले. इथे मेहनत घेऊ लागले. परवाची लोकसभा निवडणूक ते लढवणार नव्हते. जवळ काही लाख, घरची जमीन समाज कारणात गेलेली. जात दांडग्या व धनदांडग्या समोर आपण पासांगाला ही नाही ही स्पष्ट पणा परंतु माझ्या मागे तेली ताकद आहे. या तेली समाजाला आपले ॅम्हणाले तर महाराष्ट्रातील तेली तुम्हाला मत देईल ही जाणीव भाजपास झाली म्हणुन धनदांडग्या पेक्षा तुमच्याकडे समाज आहे. या बळावर उभे राहाले आणी मुळात विदर्भात व महाराष्ट्रात क्षणात संदेश गेला त्याचे फळ भाजपाला मिळाले. सर्व विदर्भात सर्व लोक सभामतदार संघात तेली ताकदीने भाजपा सावरला व जात दांडगे घरात बसले ही तडस साहेबांची समाज निष्ठा आहे. आम्हाला आडवाल तर. तुम्हाला ओलंडून जाण्याची ताकद समाजात आहे हे त्यांनी सिद्ध केले.
मी तसा शंभर टक्के पुणेकर प. अध्यक्ष पदी काम करीताना मला प्रांतिकचे उपाध्यक्ष पद दिले. त्या पदाला न्याय देऊ लागलो परंतु माझ्या व्यापातुन किंवा अन्य कारणाने मी सक्रीय नव्हतो. मी सक्रीय नाही याची जाणीव त्यांना होताच पुणे परिसरात येताच ते भेटायला बोलवत कधी कधी समक्ष घरी येत. समस्या समजून घेता कधी कधी शांत रहाणे हाच परस्थीतीवर मात करण्याचा चांगला मार्ग आसतो. हा सल्ला देत कार्यकर्ते थांबला नाही पाहिजे त्याच्या अडचणी सुटल्या पाहिजेत त्यावर मात करता आली पाहिजे हि त्यांची शिकवण नवी उमेद देऊ शकली. माझ्या सह अनेक पदाधीकार्यांना ते परके नव्हे तर घरातील एक घटक वाटतात व तसे वागतात ही. त्यांच्या मुळे महाराष्ट्र तेली महासभा महाराष्ट्र रूजली हे सर्व मान्य करतात.
त्यांना वाढदिवसाच्या सर्व पुर्णकरा तर्फे हार्दिक शुभेच्छा.