- पोपटराव गवळी, अध्यक्ष प. महाराष्ट्र
स्वातंत्र्या नंतर जात दांडग्या व धनदांडग्या समाजाने बहुजनहिताय बहुजन सुखाय हा मुखावटा रचुन तेली समाजाची फक्त मते घेतली. तेलि हिताय एैवजी तेली समाज हिवताप केला. याची पहिली जाणीव तडस साहेबांना प्रथम झाली. राबायला. झटायला आपण पण आपला विकास केंद्रबिदु जवळ येताच विकासा पासुन तेली दुर कसा जाईल या साठी जात दांडगे प्रामाणीक प्रयत्न करीत होते. याचा अनुभव ते देचळी नगरीचे नगराध्यक्ष असताना आला. विधानपरिषदेसाठी आमुचा मुलभुत हाक्क आहे. स्थानीक मतदार संघात आमचे मतदार बहुसंख्य असताना आम्हाला संधी नाही. तर संधी कोणाला जात दांडग्यांना हे मंजुर नाही म्हणत ते रिंगणात अपक्ष म्हणुन उतरले. सर्व पक्षातील तेली मते एक केली. या मतावर ते आमदार झाले. मी आमदार झालो ते कुणा पक्षामुळे, कुणा नेत्यामुळे, कुणाच्या तरी पैशा मुळे नव्हे तर मी आमदार झालो तेच मुळात माझ्या समाजामुळे. राजकारणाच्या फडावर या विदर्भ केसरीने अनेक चित पट कुस्त्या केला. कधी हार ही घेतली पण तेली मताशी तडजोड, दगाबाजी, धोकेगीरी, फसवेगीरी केली नाही तर जातदांडग्यांना ठणकावून सांगीतले बाबारे मी जो कोण आहे ते एक तेली आहे म्हणुन. तुम्ही जात दांडगे धनदापंडगे असाल तुम्हाला राजकारणाची सोबत हवी असेल तर मी तेली विकासाच्या विचार घेऊन येतोय त्याला तुम्ही सोबत द्या. ही विचाराची बैठक त्यांनी ठेवली. मा. शरद पवार असतील ना. गडकरी असतील त्यांना हे स्वामीमानी बोल विचार व आचार करावयास लावतात हे वास्तव म्हणजे खासदार रामदासजी तडस.
घराला घर पण दारात नगराध्यक्षाची गाडी जोडीला दोन दोन वेळ कुस्तीच्या आखाड्यात मिळालेले विदर्भ केसरी हे कतृत्व व संघटनेचे नेतृत्व राजकारणात स्वत:ला काही मिळण्यापेक्षा समाजाला मिळावेत स्वत:च्या घरातील ५० एकर शेती संभाळावी जमेल तर त्यात वाढ करावी ही अपेक्षा असणे रास्त परंतु १५ वर्षा पुर्वी महाराष्ट्र तेली महासभा प्रांतिक अध्यक्ष पद मिळाले हे मिळाल्या नंतर या पदाला न्याय देणे हे ठरवून ते महाराष्ट्रात फिरू लागले. प्रवास, निवास जेवण हे स्वत: करत सुदुंबरे व नागपुर येथिल महामेळावे भरवणे हे अवघड धनुष्य खांंद्यावर घेतले. ते घेताना समाज ढवळून काढण्यासाठी त्यांनी जिल्हा तालुका व गावे पिंजुन काढली किमान चार लाख बांधव हजारो मैलावूरन सुदूंबरे येथे घेऊन येण्याचे दिव्य त्यांनी यशस्वी केले. या झुंजीत लाखो रूपये गेल. पण मागे सरले नाहीत. परंतु महामेळाव्याद्वारे महाराष्ट्रातील बड्या राजकरण्यांची झोप उडवली हा अफाट समाज जर असाच जागा होऊन संघटीत झाला तर आपले राजकारण तेल्याच्या वळचनीला जाईल. या वेळी काही हुशार मंडळींनी तेली आडवा तेली हटवा हा अघोषीत अजंठा राबवला. मी तेली आहे. आणि तेली म्हणुनच निवडून येतो हे ठसवणारे रामदासजी तडस यांच्यासाठी मोर्चे बांधणी केली. त्यातुन आमदारकीत अपयश दिले. हे अपयश खिशात ठेवून ते समाज पिंजुन काढत होते. ते करिताना घराला घर पण देणारी जवळची ५० एकर जमीन घरापासुन दुर गेली हे शेवटी समजले पण ते डगमगले नाहीत हीच त्यांची तेली निष्ठा.
शांत झोपत असणारा समाज किंवा मी झोपलेलो आहे याचे सोंग वठवणारा रहाणे ही सामाजीक अवस्था जावुन जेंव्हा समाजाबाबत होतो. तेंव्हा या जाग्या झालेल्या समाजाला संघटीत ठेवणे त्याचे प्रश्न समजावून सोडवणे हे सुजान नेतृत्वाचे कर्तत्व आसते. या साठी सामाजीक प्रश्नाची जाणीव पुर्वक नोंद व अभ्यास करून सोडवणे ही त्यांची प्रयत्न प्रणाली प्रत्यक्ष समाजाच्या शेवटच्या व्यक्ती पर्यंत जाणार्या बांधवाच्या घरा पर्यंत जाणार्या कार्यकर्त्यांला पाठबळ देणे. त्याच्या अडचनीला समामेरे जाणे ही वाटचाल. कार्यकर्त्यावर होणारे आघात समजावून घेऊन मार्ग काढणे ही रूप रेषा कार्यकर्त्यांची फौज तयार झाली. यात हौसे गवसे नवसे हे असणारच यातून स्पर्धा ही स्पर्धा कामाची असावी. ही स्पर्धी समाज उपयोगी असावी ही स्पर्धा विचारांची असावी ही त्यांची शिकवण. मी तेली तुम्ही तेली आपण सर्व तेली. मग काम करिताना मते असावीत पण भेद नको. आज पर्यंत या भेदावरच जात दांडगे व धनदांडगे मोठे झालेत आपले मतभेद आपण आपल्या घरात मिळवू ते न मिटवण्या नुकसान समाजाचे होणार आहे. आपण कष्ट घेऊन समाज बांधवानी आपण केली परंतु परवाच्या विधान सभे दरम्यान तेली विरूद्ध तेली उभा करून समाजाचे हित न होता अहित झाले. याची वेदना त्यांना आज स्वस्थ बसू देत नाही. भविष्यात तेली समाजाचे किमान २० ते ३० आमदार झाले पाहिजेत हे त्यांचे ध्येय आहे.
राजकीय सत्ता म्हणजे समाजाचा विकास हे जरूर आहे. परंतु जीवनाच्या विविध क्षेत्रात ही आपण ठसा उमटला पाहिजे. शिक्षण सहकार, औद्योगिक, व्यापार या क्षेत्रात ही आपण संघटीत राहुन एक विचार केला तर भविष्य अवघड नाही याची जाणीव ते अनेक वेळा करून देतात. जवळ आलेल्या अनेकांच्या अडचनी ते प्रमाणीक पणे दुर करण्यास प्रयत्न करतात. मी तुम्ही व आपण सर्व तेली एक होऊ हे त्यांचे ध्येये त्यांनी बरेच पुर्ण केले आहे. या नंतरचा टप्पा गाठण्यासाठी प. महाराष्ट्र तेली महासभा व बांधवा तर्फे हार्दीक शुभेच्छा.