ठाणे, मुंबई तथा कोकण परिसरातील सर्व तेली पोटजातीच्या महिलांना विनम्र आवाहन करण्यात येतेकी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने आपल्या भगिनी सौ. पुष्पाताई बोरसे, (ठाणे विभाग) आणी श्रीमती अनिलाताई चौधरी ( मुंबई विभाग) व त्यांच्या सर्व सहकार्यांनी रविवार दि.१९ मार्च रोजी दुपारी २:०० ते ६:०० महिलादिना निमित्त तेली समाज महिला मेळावा आयोजित केला आहे तरी आपण प्रचंड संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती- आपला समाजबंधू, सुनिल चौधरी यांंनी केली आहे.
८ मार्च रोजी झालेल्या जागतिक महिला दिवसाच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी, मुंबई- ठाणे विभाग (ठाणे, पालघर, नवी मुंबई जिल्हा) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १९/०३/२०१७ रोजी महिला मेळावा घेण्याचे योजिले आहे. स्थळ:- राम मंदिर हाॅल, हंस नगर, गोदुताई गार्डन जवळ, सिद्धेश्वर तलावा बाजुला, खोपट, ठाणे (प) वेळ :- दुपारी २ ते सांय.६ तेली समाज हा आर्थिक- सामाजिक- राजकीय दृष्ट्या विकसनशील असून तेली समाजाला विकासाची द्रुतगती मिळावी यासाठी समाजातील माता- भगिनींचे मनोधैर्य, आत्मविश्वास, व सबलीकरण करणे जिकरीचे व सध्याच्या घडीला महत्वाचे वाटते. या कारणासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्याप्रमाणे घरात स्त्री शिकली कि घर शिकते. तसच स्त्री सामाजिक नेतृत्व शिकली कि ती समाज अधिक सबळ बनवते. तरी या महिला मेळाव्यास समस्त तेली महिला माता भगिनिंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवून द्यावे. सौ पुष्पाताई भगवान बोरसे, ठाणे विभागीय अध्यक्षा- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा- महिला आघाडी, श्रीम. अनिलाताई चौधरी मुंबई विभागीय अध्यक्षा- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा- महिला आघाडी