अखिल भारतीय तेली महासभेची राष्ट्रिय कार्यकारिणीची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या कार्यक्रमामध्ये महासभेच्या मुंबई कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. महासभेच्या मुंबई अध्यक्षपदी गोरेगाव येथे वास्तव्यास असलेले व अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले संतोष गुप्ता यांची वर्णी लागली आहे. मुंबईमध्ये संघटन वाढीवसाठी एक मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर आली असल्याचे मत गुप्ता यांनी व्यक्त केले. भिकाजी केशव भोज, प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र व यशवंत कुमार गुप्ता यांच्या हस्ते गुप्ता यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.संघटनेने आपल्या वर दर्शवलेल्या विश्वासाबददल त्यांनी संघटनेचे आभार मानले व संघटन वाढीव साठी अहोरात्र मेहनत करणार असल्याचे भाष्य त्यांनी कार्यक्रमामध्ये उपस्थित लोकांना संबोधताना केले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade