सातारा जिल्हा महिला अध्यक्षा सौ. सुरेखा हाडके यांनी आपला अहवाल मांडताना नमुद केले की, समाजातील पुरूष मंडळींनी महिलांना देखील समाजकार्य करण्याची समान संधी द्यावी. संघटनेच्या कार्यात महिलांचा दिवसेंदिवस सहभाग वाढत असुन लवकरच शिरवळ तेथे महिलांचा विभागीय कार्यक्रम घेण्याचा विचार चालु आहे. महिलांचा समाज कार्यातील सहभाग वाढावा यास जिल्ह्यातील जबाबदार पदाधिकारी यांनी प्रोत्साहन देणेची गरज असल्याचे त्यांनी बोलुन दाखवले. कोरेगांव तालुक्याच्या माजी सभापती व संघटनेच्या महिला पदाधिकारी कु. ज्योती भोज या देखील बैठकीस हजर होत्या. भुईंज येथील संजिवनी दळवी तसेच सौ. राम पडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.