महाराष्ट्र प्रांतीक तेली महासभा बैठक :- सांगली जिल्ह्याचे डॉ. संजय गताडे यांनी सांगीतले की, तालुका व जिल्हा पातळीवर सामाजाची संपर्क कार्यालये असावीत तेथुन सर्वसामान्य समाजबांधवास देखील महाराष्ट्रात कुठेही पदाधिकार्यांशी संपर्क साधता यावा. समाजाने हायटेक व्हावे. ही कार्यालये आधुनिक कॉम्पुयटर प्रणालीने एकमेकास कनेक्टेड असावीत. सांगली सचिव नागेश तेली यांनी मागणी करताना सांगीतले की, नेत्यांनी तालुका जिल्हा पातळीवर संघटनेला खर्चासाठी काहीतरी फंड उपलब्ध करून द्यावा ज्यायोगे नवीन पिढीसाठी कॉरीयर मेळावे, उद्योजक मेळावे, कृषी वा व्यवसायिक सेमीनार घेता येतील. पदाधिकारी यांना सामाजिक उपक्रम राबवताना खर्चाच्या मर्यादा येतात. इतर जातींच्या समाजाचा अशा कामासाठी फंड आहे. नेते मंडळींनी याकडे आता लक्ष देणे गरजेचे आहे.