महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलीक महासभा याच्या सुचनेप्रमाणे महाराष्ट्रातील जिल्हे, तालुके व गावपातळीवर तेली समाजाचे संघटन करण्याचे नियोजीत करण्यात आले आहे. यानुसार रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ यांच्या दि.२५/०२/२०१८ रोजीच्या जिल्हा कार्यकारणीत ठरल्याप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील युवक, युवती व महिला यांच्या तालुकास्तरावर समित्या प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार रत्नागिरी तालुक्यात रविवार दि १५ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ठीक १०.३० वा, बालाजी मंगल कार्यालय शांतीनगर, ता.रत्नागिरी येथे युवक, यवुती व महिला यांचे अधिवेशन मेळावा घेण्यात येणार आहे. तेली समाज संघटीत होण्यासाठी खेड्या पाड्या, गाव वस्ती, शहर तालुका या ठिकाणी विखुरलेला तेली समाज एकत्र येणे काळाची गरज आहे. यासाठीच आपली सवांची उपस्थिती । व एकजूट दाखविण्यासाठी वेळात वेळ काढून दि. १५ एप्रिल २०१८ रोजी आयोजित केलेल्या रत्नागिरी । नालका स्तरीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. तरी । रत्नागिरी तालुक्यामधील तेली समाजातील युवक, युवती व महिला यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.