महाराष्ट्र प्रांतीक तेली महासभा बैठक :- कोल्हापुर जिल्हा प्रांतीक महासभेचे अध्यक्ष शिवाजीराव माळकर सह इतर १५ पदाधिकारी उपस्थीत होते. माळकर सर हे निवृत्त प्राचार्य असुन सद्या ते महत्वपुर्ण शिक्षण संस्था चालवतात तसेच ते अनेक शिक्षण संस्थावर पदाधिकारी असल्यामुळे कोल्हापुर प्रांतीक महासभेची वाटचाल आशादायी आहे. जिल्ह्यातील लिंगायत तेली समाजाचे महत्वपुर्ण पदाधिकारी सुनिल सावर्डेकर सह सह पांडुरंग वडगांवकर, गणेश वाळवेकर, मोहन फल्ले आदी अनेक पदाधिकारी आवर्जुन बैठकीस उपस्थीतीत होते. सावर्डेकर यांनी प्रांतीकच्या माध्यमातुन तेली समाज संघटनेचे मजबुतीकरण करण्याबाबत त्यांची सकारात्मक भुमिका मांडली. सातारा - सांगली - सोलापुर पेक्षा ही कोल्हापुरात लिंगायत तेली समाजसह एकुणच तेली समाज जास्त असुन आमची जनगणना झालेली आहे. असे नमुद केले. पोटजातींनी आपापल्या जिवन प्रणाली, संस्कृतीचे आपापल्या परीने पालन करावे, त्यात संघटना हस्तक्षेप करत नाही पण आपण सर्वांनी तेली या एकाच विचाराने संघटीत होणे गरजेचे आहे ही त्यांची भुमिका अत्यंत संकारात्मक होती. त्यामुळे कोल्हापुर जिल्ह्यात संघटनेचे काम या पुढील काळात आणखी प्रगतीपथावर असेल याची प्रचिती आली. सांवर्डेकर, त्यांचे सहकारी व शिवाजीराव माळकर सर यांनी कार्यकारीणीचा पुढील कार्यक्रम मे महिन्याचे अखेरीस कोल्हापुर येथे घेण्याचे घोषीत केले.