औरंगाबाद : जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यमंदिरात औरंगाबाद जिल्हा तेली समाजातर्फे नुकताच तेली समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला. खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्तअण्णा क्षीरसागर हे होते. तेली समाजाने आता गट-तट सोडून संघटित व्हायला पाहिजे, असे आवाहन क्षीरसागर यांनी यावेळी केले.
या मेळाव्यामध्ये राज्यभरातून 700 वधू-वर आले होते. टाळ्यांच्या कडकडाटात वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. सभागृहात संताजी जगनाडे महाराजांचा वेळोवेळी जयघोष होत होता. खैरे- क्षीरसागर गळाभेट चर्चेचा विषय ठरली. विधवा, विधुर व अपंग यांचासुद्धा परिचय यावेळी करण्यात आला. प्रास्ताविक कचरू वेळंजकर यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश कर्डिले, दामिनी महाले यांनी केले. मनोज सन्तानसे यांनी आभार मानले.
मनोज शिनगारे, जगन्नाथ पिंपळे, जे. यू. मिटकर, विश्वनाथ गवळी, मनीषा सिदलंबे, इंदूताई मिसाळ, सुनीता सोनवणे, प्रल्हाद कसबेकर, कैलास सिदलंबे, दादा पंडित, कैलास देहाडराय, रवी पवार, सुभाष थोरात, रतन घोंगते, काशीनाथ मिसाळ, उत्तमराव तावडे, अँड. विठ्ठल साबणे, बाबूराव पंडित यांच्यासह मान्यवरांची मेळाव्यास प्रमुख उपस्थिती होती. विष्णु सिदलंबे, रमेश क्षीरसागर व साई शेलार यांनी आपले मनोगत मांडले.
राजेश शिंदे, बाबासाहेब पवार, अशोक चौधरी, साई शेलार, भगवान मिटकर, नारायण दळवे, शिवा महाले, सुरेश मिटकर, प्रवीण वाघलव्हाळे, अॅड. गजाजन क्षीरसागर, मंगेश वाघमारे, कृष्णा पेंढारे, शिवकुमार भुजबळ, ईश्वर पेंढार आदींनी या मेळाव्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.