श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे : आज रविवार दिनांक 28.1.2018 रोजी सदुंबरे येथे संस्थानचे अध्यक्ष मा.शिवदासशेठ ऊबाळे यांच्या अध्यक्षते खाली संस्थानची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली सभेसाठी विविध जिल्हयातून 50 हून अधिक समाज बांधव व भगीनी ऊपस्थीत होते. सभेच्या सुरूवातीला मा. सचिव अॅड.मा.रायरीकर साहेब यांनी मागील कार्यकारीणीच्या कालावधीतील कार्याचा अहवाल समाजबांधवा समोर सादर केला. यानंतर निधन झालेल्या समाजातील ज्ञात अज्ञात समाज बांधव व भगीनीना श्रद्धांजली वाहण्यात आली. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये वाघोली ग्रामपंचायती मध्ये मा.अध्यक्ष शिवदासशेठ ऊबाळे हे सदस्य पदि निवडून आले व सौ.वसुंधराताई शिवदासशेठ ऊबाळे सरपंच पदी निवडूण आल्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. आजच्या सभेला विविध जिल्ह्यातील अनेक समाज बांधव ऊपस्थीत होते.
यानिमीत्ताने अनेकांनी आपले मनोगत व विचार व्यक्त केले. यामध्ये अहमदनगर जिल्हाध्यक्ष मा.विजय काळे,प्रा.दिवटेसर,मा.कवाडे साहेब नाशीक, अनिल राऊत चिंचवड, श्री. अवसरे साहेब, मावळ, सोमनाथ लुटे प्रवरा, नेराळेताई पुणे, सौ.झगडेताई मावळ ,रामनाना राऊत, श्रीगोंदा, पुरूषोत्तम सर्जे अहमदनगर, मा.अध्यक्ष अंबादास शिंदे पुणे आदिनी मनोगत व्यक्त केले. विचार व्यक्त करत असताना समाजाचे संघटन होणे अत्यंत गरजेचे आहे.तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये संताजी महाराजांच्या समाधीस्थळा बद्दल माहिती नसल्याची खंत व्यक्त केली. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात संताजी महाराजांच्या कार्याचा प्रसार करण्याची सुचना केली. महाराष्ट्र शासनाकडून मिळणा-या तिर्थक्षेत्र विकास आरखड्याच्या माध्यमातून मिळणा-या मदत निधीची चौकशी करून मदतनिधी मिळवण्यासाठी सुचना करणेत आली. धर्मादाय आयुक्त कार्यालयात आवश्यक त्या कागद पत्रांची पुर्तता करून दिलेल्या वेळेत कागदपत्रा दाखल करण्याची सुचना करण्यात आली.
सदुंबरे संस्थानचे माजी अध्यक्ष मा.जनार्दन शेठ जगनाडे यानी आपल्या कारकिर्दीत झालेल्या कामाचा तपशील विस्तृत पणे सभेमध्ये सादर केला. मा.पोपटराव पिंगळे यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना मागील कार्यकारीणीचे अभिनंदन केले व नवीन कार्यकारीणीला योग्य प्रकारे काम करण्याचा सल्ला दिला. सौ.वसुंधराताई ऊबाळे यानी सत्काराला ऊत्तर देताना समाजाने ऊबाळे परीवारावर विश्वास दाखवून शिवदासशेठ ऊबाळे यांची सर्वांनुमते अध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल .समाजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली सरकारी निधीबद्दल विस्तृत माहिती देऊन आवश्यक तेथे सहकार्य करू असे आश्वासन दिले. शिवदासशेठ ऊबाळे यानी आपल्या भाषणात विविध विकास कामांना हात घातला. यामध्ये संरक्षण भिंत,पेव्हींग ब्लॉक बसविणे,समाजातील व्यक्तींना लग्न कार्यासाठी सभामंडप उभारणे, मंदीर परीसरात सध्या सुरू असलेल्या विद्यालया संदर्भात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.शरद पवार साहेब याची भेट घेऊन अनेक दिवस रेंगाळत असलेला विषय समाज हिताच्या दृष्टीने मार्गी लावणे. हि सर्व कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याचे समाजाला आश्वासन दिले. यासाठी समाजाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून नवोदीत कार्यकारीणीला सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्याध्यक्ष मा.विजयभाऊ रत्नपारखी यानी आपले मनोगत व्यक्त करताना भविष्यातील विविध कामांचे नियोजन सांगीतले तर ज्या रखडलेल्या कामामुळे नेहमी समाजाची नाराजी निर्माण होते.अशी कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याची सुचना करण्यात आली. इंदोरी गावचे सुपुत्र. समाज बांधव श्री.शांताराम तुकाराम अवसरे (-cp ठाणे) यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित केल्या बद्दल समाजाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.व सभेमध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. मा. कार्याध्यक्ष विजयभाऊ रत्नपारखी यानी सन.2017 ते 2022 या कालावधी साठी संस्थेची कार्यकारीणी जाहीर केली. उपस्थीतांचे आभार सहसचिव भिकाजी भोज यांनी मानले. अत्यंत खेळीमेळीच्या आंणि उत्साही वातावरणात सभा झाल्याचे उपस्थीतांमधून प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. स्नेह भोजनानंतर सभेची सांगता झाली.