हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 1) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
सन 2014 च्या निवडणूकी पुर्वी मोदी बंधु महाराष्ट्रासह देशभर फिरू लागले. तेली समाजात मोदी तेली म्हणून मार्केटींग करू लागले. दडपलेला समाज अकर्षीत होऊ लागला. या वेळी त्यांनी तेली समाजाची एक संघटना आकाराला आणली. त्याचे राज्यव्यापी आंदोलन तामीळनाडूत झाले ही. त्या वेळी महाराष्ट्राची धुरा पुणे परीसरातील एका बांधवाला दिली. वय वर्ष 40 परंतू गेली 25 वर्ष ते भाजपाच्या मातृ संस्था म्हणजे आर.एस.एस. मध्ये संस्कारीत झालेले त्यांना काही दिवसा पुर्वी विचारले संघटनेचे थांबलेली काम सुरू करा. लोकसभेच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. त्यांनी मान डोलावली पण पुढे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकले नाहीत.