हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 2) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
एक खासदार सहा आमदार, एक महामंडळ सदस्य ढोल बडवून किंवा नंदूरबार येथे 2014 च्या निवडणूकीच्या पुर्वी झालेल्या मिटींगचे हे छोटेसे फलीत. दहा टक्के लोकसंख्येच्या विचारातून पाहिले तर पदरात काय तर टक्का ही नाही. या बद्दल आता कोणच बोलत नाही. या साठी प्रबोधन रचना व संघर्ष तोंडी लावण्यापूरता इतर मागास सामाजातील घडामोडी पाहिल्या तर समोर येते विरोधक व सत्तेचे वाटेकरी त्याच समाजाचे. धनगर, वंजारा, बंजारा, माळी या समाजातील लढाई ही विचार पुर्वक योग्य दिशेने चांगली नाही पण बरी आहे. आम्ही अल्पसंतोषी एवढे आहोत देशाचा पंतप्रधान तेली किती गर्वाची, किती अभिमानाची बाब आहे. हे ढोल वधु वर मेळाव्यात समाज मेळाव्यात गातो. डरकाळ्या फोडून व त्या एैकून समाज आता सावध होऊ लागला. डरकाळ्या फोडणार्यांना सत्तेतील फक्त मधाचे बोट मिळाले. वाटा तर सोडाच फक्त मधाचे बोट, समाजाच्या पदरात काय पडले. समाज भाषणबाजी व मोठ मोठी स्वप्न पाहून दमला. गावपातळी ते राज्य पातळीवर एकमेकात लाढाई करण्यात बराच काळ गेला. पदाची पाटी कपाळावर असावी. पैसा खर्च करावा नेत्यांना बोलवावे आगदी त्यांच्या साठी एसी रूम बुक कराव्यात पद मिळवावे किंवा टिकवावे. समाजाला काय हा प्रश्न आता उभा रहात आहे. मराठ्यांच्या राजवट अशीच पलटली. आज ब्राह्मण्याच्या राज्यात. आपण तसेच आहोत. ही जाणीव डरकाळ्या फोडणार्या नेत्यांना असून नसल्या सारखी आहे. समाजाच्या शेवटच्या माणसाला नक्की काय चालले हे समजत नाही.