हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 3) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
मोदी तेली ही ढोल बडवणारी आपली मंडळी सोईस्कर विसरतात नव्हे तर तुमच्या माझ्या पेक्षा त्यांना चांगले माहित आहे मोदींनी 2002 साली मुख्यमंत्री होताच मोड घाची ही जात ओबीसीत बसवली. आणी मोड म्हणजे व्यापारातील धनवान समाज एक सहीने शेकडो वर्षाचा समाज की जो देशाच्या लोकसंख्येत फक्त 100 ते 200 लोकसंख्येचा आहे. मागास वर्गीय झाला. महाराष्ट्रात आपली खुर्ची संभळण्यासाठी हजारो वर्ष सत्ता उपभोगणारा मराठा समाजाला मराठा कुणबी बनवले. एक दलित समाजातील व्यक्तीने आपल्या हितासाठी ओबीसींचा बळी घेतला स्वातंत्र्यात कालेकर आयोग. मंडलआयोग या वेळी ब्राम्हण्याने जे उद्योग केले ते यशस्वी होण्यासाठी एक प्रभावी कुनीती वापरली तो म्हणजे बनीया तेली समाजाचे झाले व मागास वर्गीयांचे राजकारण आपल्या मुठीत घेतले. त्याचे जीवंत उदाहरण परवा नागपुरात घडले. महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी नागपूर समाजासाठी निवडणूक नजरेला टापुत ठेऊन एक कोट रूपये देऊ जाहीर होताच. आमचे सोशल मिडीया वाले एक साथ बोलू लागले हाच तो आपला विकास. मला किव करावी वाटते की अशी की ज्या समाजाचा बुद्धीजीवी वर्ग जाग्रृत असतो. जो वर्ग नेहमी नव ठिकाण शोधतो समाजाला सशयक्त बनवतो तो वर्गच संपत चालला आहे किंवा भाटगीरीच्या डरकाळ्या फोडून त्या वर्गाचा आवाज दडपला जातो. शरदपवरांच्या नजरेच्या टापूत असलेल्या राष्ट्रवादी (मराठावादी) काँग्रेसच्या उपस्थीतीत 21/12/2003 साली महामेळावा घेतला. सुदुंबरे गाव जगाच्या नकाशावर गेले. व अनेक पाऊले तिकडे वळाली. गाव खासदारांनी दत्तक घेतले विकासाची कोट्याने पाऊले आली. नाव संताजी भूमीचे पण मिळाले काय ? फक्त मिळवुण तेली नेत्याना घरात बसवले. तिच गत आजच्या मुख्यमंत्र्यांची ते ज्या मतदार संघातून निवडून येतात तेथे तेली मत 30 ते 40 टक्के. याच समाजांच्या मतावर तेच नव्हे तर विदर्भातून भाजपा सत्तेत गेला हे वास्तव आहे. मुख्यमंत्र्यांनी समाजासाठी काय दिले. ? एक मंत्री ते ही त्यांच्या नजरे समोरचे एक इतर मागासवर्गीय महामंडळांत सदस्य पाच सदस्यात दोन ओबीसी त्यांना अधीकार किती ? कार्यनुभव किती ? आणी निर्णय क्षमतेत यांच्या सदस्य पदाला किती किंमत ? मुख्यमंत्र्यांना हे नक्की माहीत आहे. ढोल बडवत रहा यातच विकास आहे. ?