हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 4) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
परवा एका कार्यक्रमास गेलो होतो. एका विभागाचे समाजाचे अध्यक्ष नेते शासकीय विश्राम गृहात भेटले. आणी तेल्याचे प्रश्न मांडत असताना त्यांनी आपली वेदना मांडली. माझ्या तालुक्यात प्रचंड मराठा समाजाचा मुक मोर्चा निघाला होता. यात मी तन मन व धनाने सामील होतो. का तर माझा व्यवसाय मोठा तो टिकला पाहिजे. नेते म्हणून मिरवणारे हे असले समाज बांधव अनेक ठिकाणी आहेत. त्यांना पैसा, पद व मोठेपण एवढेच त्यांना माहित असते. ही मंडळी समाजाशी एकनिष्ठ आहेत का ? ही मंडळी समाजाचा विकास करू पहातात का ? ही मंडळी समाजाच्या प्रश्ना साठी रस्त्यावर उतरतील का ? ही मंडळी म्हणजे समाज का ? यांची आचार विचार कृती म्हणजे समाज का ? हे असले प्रश्न समाजातील धनदांडग्यांना विचारने हा गुन्हा आहे का ? समाजाच्या विचार पीठावर समाज विकासाच्या गप्पा मारणारी ही मंडळी जर असतील तर मराठापण व ब्राम्हण्य यांचे आपण गुलाम आहोत हे उद्या अभिमानाने सांगणारा समाज लवकर घडन करेल. हे का सांगीतले तर फक्त तिन आमदार सत्तेवर असलेल्या भाजपाने महाराष्ट्रात दिले. मोदी बंधू महाराष्ट्रात सत्कार, भाषणे व सांगत फिरत असतात. पण समाजाच्या विकासाचा रस्ता तयार करीत नाहीत. आम्ही पण पंतप्रधांनाचे भाऊ म्हणून डोंक्यावर घेऊन फिरतो. हाच आमचा विकास हीच आमची समाज निष्ठा आम्ही तेल गाळप करणारी मंडळी. पुर्वी कारू, नारू ही होतो. पुर्वी उदमी ही होतो. आमचे नेते इतिहास सांगतात तो म्हणजे इथे तेली व्यापारी होता. तेली देश परदेशात व्यापार करीत होता. तेली समाजाला मोठी किंमत होती पण सुज्ञ मंडळी जाणीव पूर्वक हे सांगत नाहीत तर मुद्दा असा मोदी बंधूंनी कुठेच महाराष्ट्रात तेली नेतृत्व उभे करावयास धडपड केली नाही. तेली समाजाचा विकास झाला पाहिजे हे संघटन बांधले नाही. फक्त तेली पंतप्रधान त्यांचे आम्ही बंधू. सत्य परिस्थीती अशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व विदर्भातील भाजपाचे आमदार हे तेली मतावर निवडूण आलेत. या साठी मराठा समाजाने धाकात ठेवलेली स्वातंंत्र्यात व स्वातंत्र्या पुर्वी सुद्धा मराठा समाज सत्तेत ठेवला. भाजपा सत्तेत गेला त्याला तेली मत प्रभावी होते. हे वास्तव का विसराता ? कारण आज मुख्यमंत्री फक्त एक कोट रूपये नागपूर समाजाला देऊ करतात. पण ही सर्व मंडळी मराठा समाजासमोर नांगी टाकून का ? हा प्रश्न सातत्याने केलेत व करेल सुद्धा.