हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 5) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तेली समाजाने निवडून दिले म्हणन्यापेक्षा भाजपाला सत्ता मिळालीतीच मुळात तेली मतावर. या पुर्वी काँग्रेस होती हे ही विसरता येणार नाही माजी पंतप्रधान अंध्र प्रदेशातून नव्हे महाराष्ट्रातून निवडून येत तेही तेली मतांची बेरीज ज्या मतदार संघात आहे तेथून त्यांचे व त्यांच्या पक्षाचे काय झाले ते पाहिले आहेच. परंतू आज मुख्यमंत्र्यांनी ना बोगस कुणब्यांची वाट बंद केली नव्हे तर यांच्या काळात जात प्रमाण पत्र देणार्या ऑफीस मध्ये फलक लावून मराठा कुणबी जात प्रमाण पत्र दिले जाते. पिंपरी चिंचवड सारख्या महापालिकेत जातीवंत मराठा महापौर होतो. उलट याच मराठा समाजाच्या विकासा साठी मुख्यमंत्री आघाडीवर आहेत. छटाकभर दूध गोळा करणार्या सोसायटी पासून राज्य सत्तेत ज्यांनी आपला वेळ मिळेल तेंव्हा मराठा जातीचा विकास केला त्याच मराठा समाजाच्या विकासासाठी ते आघाडीवर असतील तर आसे समोर येते की श्री. सुशिल कुमार शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदासाठी मराठा कुणबी ही जात निर्माण केली. तसेच नव्हे तर त्याही पेक्षा जादा आजचे मुख्यमंत्री करत आहेत. विसर पडला आपण तेली व ओबीसी मतावर मुख्यमंत्री झालोय तर समाजाच्या विकासाचा मक्ता घेऊन ढोल बडणवणार्यांना वटणीवर आले पाहिजे. आरे गुण गान पण मताची वसुली समाजसाठी करा. स्वत:च्या लाभाच्या पदासाठी समाजाला ब्राह्मण्याच्या दावणीला बांधू नका. ढोलबडवणे सांगतात मोदी तेली आहेत. त्यातील एकाला सोशल मिडीयावर झापले त्यांनी पूरावा काय द्यावा महासराष्ट्राचे कार्याध्यक्ष सांगतात त्यांच्यावर विश्वास ठेवा. मोदी तेली नाहीत हे सांगताच ही मंडळी अकांड तांडाव करू लागले . माझे एकच मत तुम्ही तेली आहात याचे भक्कम पुरावे पिड्यान पिड्याचे आहेत. एक परंपरा, एक संस्कार आहेत. मोदी विषयी तसे पुरावे दाखवा. पण अकांड तांडाव करून माझे तेच खरे खरे असेल ते मी मानणार ही आहे म्हणाताच ते खवळले. मी तेंव्हा एकच म्हंटले ही गावकीची हालगी वाजवण्या पेक्षा तुमच्या घरातील मुला मुलींना आच्छे दिन का नाहीत याचा पहिला शोध घ्या. अशी ढोल बडवणार्यांचे वार्या वरची वरात वादा साठी मोदी तेली मान्य करू कै. गोपीनाथ मुंडे वंजारी होते. त्यांनी सत्ता मिळवली म्हणण्या पेक्षा भाजपाला मिळवून दिली. मी वंजारी आहे. आणी माझा समाज हा मागे राहीला नाही पाहिजे ही त्यांची वाटचाल आज ही हजारो वंजारी बांधव मजुरी न करता शासकीय नोकरीत किंवा शासनाने लाभार्थी आहेत. पण गुजराथ मधील 15 वर्षे मुख्यमंत्री पद व 4 वर्ष देशाचे प्रधानपद संभाळतात तेली समाजासाठी, ओबीसी साठी असे कोणते चांगले निर्णय घेतले हे ही समाजा समोर आले पाहिजे.