हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 6) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
समाजाचा विकास करावयाचा असेल. लाभाची पदे एक दिली म्हणजे अबाधी अबाधात वाटत असेल तर ही माणसीकता पहिली बदली पाहिजे. समाजाच्या मागील नेत्यांनी काँग्रेसच्या समोर अशाच हालग्या वाजवल्या गावात विकासाची दवंडी देऊन आपल्या विकासाला भकास पण दिले. हे वास्तव अभ्यासून आपण भाजपाचे ढोल बडवू लागलो. पण मागचीच चुक पुन्हा करीत आहोत. तेंव्हा राजकारणी मराठा असो किंवा ब्रह्मण त्याच्या म्होरक्या व त्याच्या हातातल्या दोर्या ब्राह्मण व मराठ्याकडे असेल तर आपण नुसतेच नाचतो, की आज कदाचित मोदी तेली क्षणभर मान्य करू पण त्यांची दोरी ही मुळात नागपुरात रेशीम बागेत आहे. याच दोरीला हिसका देऊन आठवण करून दिली पाहिजे. नुसते हिंदू प्रेम आम्ही पहातोे. आता तरी तेली विकासाचे काय ते बोला नाहीतर मागचा तुमचा वनवास थोडा पहा. कारण ज्याच्या पाठी मागे तेली लागले तो भकास होतो जो तेल्याला वापरून घेतो त्याला तेली संपवतो, म्हणून ब्राम्हण्याने सांगीतले तेल्याचे तोंड पाहू नका ...
जय संताजी