श्री संताजी पुरस्काराचे पुढे काय झाले ? बाळगंगाधर टिळक तेली तांबोळ्यांचे पुढारी नव्हते पुण्याच्या महापौरांनी सिद्ध केले ??
पुण्याचे कार्यक्षम नगरसेवक व माजी महापौर श्री. आबा बागुल यांच्या धडपडीतून शासकीय संस्थे मार्फत पुरस्कार देण्याचा पुणे महानगरपालिकेत ठराव झाला. पहिला पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक मा. आ. उल्हासदादा पवार यांना दिला. पण दिड वर्ष होवून सुद्धा साधे पुरस्काराचे नाव ही जाहीर झाले नाही. त्याचे साधी विचारपुस ही नाही. राजश्री शाहू महाराज जेंव्हा आरक्षण देत होते तेंव्हा बाळगंगाधर टिळक सोबत्याची तडफदारी करीत होते. पण स्वत:ला तेल्या तांबोळ्यांचे पुढारी ही चिकट पट्टी लावून लोकमान्यपदवी मिरवत होते. आजच्या महापौर ह्या त्यापेक्षा ही हुशार निघाल्या पेशवाईच्या पुर्नबांधनी करू पहातात. कारण पेशवाई संत तुकाराम, संत संताजी या शुद्र ठरवलेल्या संतांच्या अभंगाला बंदी होती. आणी म्हणुन की काय संत संताजी पुरस्कार पणे महापालिकेने महापौरांनी जाहीर करावयाचा असतो. त्याबद्दल टाळा टाळा केली जात आहे. ही स्पष्ट भुमीका पुणे परिसरातील संस्थांनी व्यक्त केली आहे.
ही असंतोषाची ठिणकी पेरण्या पूर्वीच महापौरांनी पुरस्कार जाहिर कराव. कारण सन 2017 - 2018 चा पुरस्कारा साठी राखिव ठेवलेला निधी कुठे व कसा खर्च केला ते जाहिर करावे. अथवा या नव्या पेशवाईला नितीला समाज मत तसाच न्याय देईल. ही सुद्धा समाज बांधवांनी भुमीका स्पष्ट केली आहे.