आजच्या आधुनिक भारतात कोणत्याही समाजाचे अस्तित्व त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या नेत्रदीपक प्रगती वर अवलंबून असते. भारतीय घटनेने विविध धर्म पंथ जाती-पाती असणार्या देशात संधीची समानता दिलेली आहे. तेली समाजाचा विचार केला तर शैक्षणिक दृष्ट्या हा समाज उन्नत झाला असला तरी या समाजाचा प्रशासकीय सेवेमधील टक्का अत्यल्प आहे. प्रशासकीय सेवा संबंधित उमेदवाराला मानसन्मान अधिकार प्रदान करतातच त्याचबरोबर या समाजाचा नाव लौकिक निर्माण करतात. मात्र अद्यापही या स्पर्धा परीक्षा विषयी अनेक गैरसमज व अज्ञान दिसून येतात.
आजची परिस्थिती पाहता देशांत युवा वर्गात एक बेरोजगारी विषयी अस्वस्थता निदर्शनास येते. मात्र अचूक निवड अचूक दिशा तसेच सुनियोजित परिश्रम आपणास मिळू शकते. अध्यापनाची कार्य करत असताना नोकरी सांभाळून मुख्य परीक्षा तीन वेळा उत्तीर्ण करताना मला कोणताही जाणवला नाही. आपण कुठेच कमी नाही तुम्हाला विजयश्री खेचून आणायला मदत करते. मात्र आजची परिस्थिती पाहता दोन ते तीन वर्षे प्रयत्न करून तुमचा प्लॉन बी तयार असायला हवा.
सगळ्यात महत्वाचे या परीक्षा बहुसंख्य देतात त्या आपण का द्याव्यात एमपीएससी व यूपीएससी च्या वेबसाईटवर मागील दहा वर्षांत झालेल्या विविध परीक्षा त्यांचे कटऑफस त्यांची पात्रता पहा. गेल्या काही वर्षांत काही पदासाठी लायक योग्य पात्रताधारक उमेदवार नाहीत म्हणून काही परीक्षांचे कट ऑफस पर्यंत लागलेली आहेत. स्पर्धा परीक्षेत देखील शिवरायांचा गनिमी कावा वापरायला हवा. अशा पात्रता संपादन करा किती न घेणे आहे कोणती शहरातली पात्रता काय याविषयी सतर्क राहणे आवश्यक आहे. हा गनिमी कावा व त्याची नक्की काय आहे ते पुढील लेखात पहा समाजातील गुणवत्ता कमी नाही मात्र ही गुणवत्ता योग्य मार्गावर आणि पाहिजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संदर्भात ही लेखमाला सुरू करताना मी लिहिला पहिला लेख आपणास निश्चितच प्रेरणादायी ठरेल अशी आशा वाटते आणि हो महत्वाची नोंद मी नुकतीच दिलेल्या दुय्यम सेवा पूर्व परीक्षा पीएसआय, एसटीआय, एएसओ, चे अर्ज व लवकरात लवकर भरून तयारीला लागा यास परीक्षेत तेली समाजाचे बहुसंख्य यशस्वी व्हावेत ही संताजी चरणी प्रार्थना बाकी मार्गदर्शनासाठी मी आहेच
जय संताजी सुधीर रत्नपारखी सर,