मी संत संताजी बोलतोय ! भाग 1 - लेखक मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
महिपतीने बाकी काय केले या पेक्षा एक गोष्ट बरी केली. हा एकच धागा शिल्लक राहिला. हा शिल्लकच नसता तर मी इतिहासात पूर्ण पूसून गेलो असतो. आता पुर्ण पुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि तो करू नये का ? त्या समुहाकडून हिच अपेक्षा होती. कारण ते त्या जातीत जन्मले आणि अहंकारात वाढले. अहंकार जपने हा त्यांच्या जगण्याचा महामार्ग आहे. त्या मार्गाने जे जाणार त्यांनी त्यांचे काम केले. त्यांच्या भावी पिढ्यांची सोय करावी हा त्यांचा खरा रस्ता होता त्यांच्या दृष्टीने हित चुकले नाही उलट शंभर टक्के नव्हे तर नव्याव टक्के बरोबर होते. आता राहिला एक टक्का, याच एक टक्यात ते त्यांच्या दृष्टीने चुकले आणि माझी नोंद पुसटशी ठेवली. ती पुसटशी नोंद एक महामार्ग बनवला जाईल हे जर जाणीव आसती तर ही पुसटशी नोंद ठेऊ दिली नसती. आता ही एवढी धडपड का व कश्या साठी केली हे समजणे म्हणजे माझी व देहुच्या संत तुकारामांची वाट खर्या अर्थाने समजेल ती समजुन घेणे प्रत्येक मानवाची वाटचाल असावी. महिपतीने लिहून ठेवले चाकणचा संतु तेली देहूच्या तुकोबा बरोबर अभंग लिखानाचे काम करित आसे. याच साठी केली धडपड याच साठी केला होता यज्ञ. याच साठी उभे केले आम्ही युद्ध. याचसाठी किडा मुंगी सारखा मी त्या वेळी तळपता सुर्य झालो. याच साठी त्यांच्या युद्धात पूर्ण तयारीने उतरलो व यश मिळविले. पण त्या नंतर बरेच घडले व आमची संघर्षाची युद्धाची मानव मुक्तीची, देव मुक्तीची लढाई झाकण्याची, झाकळण्याची आडविण्याची फार मोठी कटकारस्थाने झाली. ही लढाई समजुन घेतली तरच पुन्हा इथे मानव मुक्तीची लढाई उभी रहाणार आहे. पुन्हा खर्या देवाच्या जवळ जाण्याचा अधीकार मिळणार आहे. नाहीतर फक्त तोंडाने जय संताजी, पुण्यतिथीला उत्सव समजुन आनंद उत्सव साजरा केल्या सारखा आव आनने. फक्त उद्या कोणी तरी हे करावे आणि मी धन्य धन्य व्हावे या साठी मी धडपड केली होती का ? माझे भले मोठे नाव देऊन राष्ट्रव्यापी ते गल्ली पर्यंत संस्था उभाराव्यात. त्या संस्थेच्या मानपानात मला फोटोत थांबवावे लागते. ते सर्व बघावे लागते. काही दिवसा पूर्वीची एक घटना सांगतो मग मला का मांडावे लागत आहे ते सहज समजेल. एका पुण्यतिथीला सात दिवस सप्ताह बसला. पुण्यतिथी दिनी हजारो बांधव भेटून गेले. दुस-या दिवशी सकाळी काल्याचे किर्तन ही झाले. महाप्रसाद ही सर्वांनी खेळीमतेळीत घेतला. आणि दोन प्रहरी मिटींग सुरू झाली अंधार पडला उजेड नाही. जवळच जनरेटर होता. त्यावर उजेडाचे साधन होते. झगमाटात चर्चा । सुरू झाली. याला तुम्ही वाद म्हणतात आम्ही त्याला खल म्हणत आसु. या पेक्षा ही तुफान खल आम्ही लढत होतो. पण आशय वेगळे होते. मार्ग मानव मुक्तीचा होता. इथे एकचं ध्येय एकच खल होता माझ्या नावे असलेल्या या संस्थेच्या अध्यक्षस्थानी कोण असावा. हा मोठा फरक आहे. आमचे खल व याचे वाद या मध्ये आता या गोष्टीत मला रस नाही. इकडे हे खल कधी तोंडीत कधी ऐकामेकाची कॉलर पकडू पहाता कधी मर्यादा सोडुन शब्द प्रयोग सुरू होते. वाद होता. इथे पुढारी कोण असावा. इकडे लाईटच्या फोकस पण माझ्या समाधी मंदिरात अंधार पडून दहा पाच मिनीटे होताच त्या कल्लोळात कोप-यात असलेल्या बांधवाला माझी आठवण झाली आणि त्याने समई पेटवली, तो बापडा मंदिरात विठ्ठलाचे नाव घेत बसला. त्याला या असल्या खलात रस नव्हता. आणि मला आमच्या काळातील खलात रस होता. बंदिस्त केलेला देव सोडविण्याचा देवाच्या दारात समता निर्माण करण्याचा. वेद त्यांनीच वाचावे, ऐकावेत यासाठी गर्वीष्ट झालेल्यांच्या मान झुकविण्यासाठी आम्ही खल करित होतो. ते दांभिक होते. ते फसवत होते. ते लबाड होते. ते देव सांगतो म्हणत म्हणत देवच दुडवत होते. यासाठी आम्ही खल करित होते. - आशा खलात पुढार पण नको होते. तुकोबाराय, मी नामाजी माळी, गवार शेठ ही सगळी जन्माने शुद्र ठरवलेली फक्त कडुसकर तेवढे ब्राह्मण. आम्ही पुढारी नव्हतो. आमच्या घरी सात पिड्या कोणी विद्वान नव्हता फक्त होती विठ्ठलाची भक्ती. ही भक्ती संत नामदेवांनी आम्हाला शिकवली होती. विठ्ठलाची भक्ती हीच फक्त आमची ठेव होती. आणि ती घेऊन आम्ही उभे राहिलो एक युद्ध जिंकले. ते जिंकलेले युद्ध शब्द रूपात ठेवले. ही ऐतिहासिक कामगिरी एवढीच केली हे सांगणे, पटविणे, लिहणे, वाचणे मुळात चुक आहे.
तुका म्हणे नाश केला । विंटबिला वेश जेणें ॥
तुकोबाराय तर ठणकावून सांगत आरे तुम्ही जो वेदं म्हणता हे आसले वेद आम्हाला वाचण्याचा, ऐकण्याचा अधीकार ही नव्हता. पण रोजच्या जगण्यात, रोजच्या दडपशाहीत आम्ही उभे राहिलो. कारण सत्य हे दुर लोटले होते. जे सत्य नामदेवांनी मी मी म्हणनारांच्या छाताडावर उभे राहुन बिंबावले. त्या नामदेवांनी तुकोबांना स्वप्नात सांगितले आणि आम्ही नामदेवांना गुरू मानुन वाटचाल सुरू केली. संत नामदेव उभे राहिले एक समता निर्माण करावयास त्यांनी समता निर्माण केली. चोखोबा सारख्या महाराला मानाने सन्मानाने पंढरपुरच्या पहिल्या पायरीचा मान दिला. गोरा कुंभार, सेना नाही नरहरी सोनार, जोगा परमानंद, सावता माळी. त्या त्या जातीत तेंव्हा पायदळी तुडवल्या जाणा-या समाजाचे ते प्रतिनिधी होते. संत ज्ञानेश्वर इकडे समाधी घेतात त्याच वेळी देवाच्या नावावर जगणारे उध्वस्त होतात. हा योग नाही संत नामदेवांनी पैठण सारख्या ठिकाणी केंद्र म्हणून काम करणा-या सांस्कृतीक दहशदवादा विरोधात एक जनसमुदाय उभा केला. त्यांनी विठ्ठलला आपला मानला जात, मतभेद, श्रींमत गरिब ही दडपशाही त्यांनी झीडकारली. मानव मुक्तीचा मार्ग दिला. हा मार्ग पुन्हा शेकडो वर्षांनी संपविला होता. पुर्वी तेली ज्या बौद्ध धर्मी होते त्या काळात ते राजे होते. ते विद्वान होते, ते धनवान होते, ते न्याय देणारे होते, ते राज्य चालवणारे होते ते धर्म प्रसारक होते. बौद्ध धर्माचा ठेवा पंढरपुरात होता. भक्ती करून व मानवता रूपाने तो बौद्ध विचाराचा होता. तो ठेवा आडगळीत होता. तो ठेवा आपला मानुन नामदेवांनी इथे समता आणली. पण नंतर हे समतेचे चाक उलट्या दिशेने फिरवीले गेले. इथे देवाचे ठेकेदार पोळत होते इथे राज्य करणारे पोळत होते. या मंडळीनी खरा नाश कला होता. या मंडळींनी आपल्या सोईंचा देव बनविला होता. समता नंको होती. जो तेली राजा होता जो तेली विद्वान होता. जो तेली जगभर फिरत होता. जो तेली औद्योगीक क्रांतीचा आधार स्तंभ होता. जो तेली कुशल पणे राज्यकारभार चालवु शकत होता. त्या तेल्याला या व्यवस्थेने गलित गात्र केले होते. त्याला द्रव्य मिळविण्याचा अधीकार चिंचोळा होता त्याला द्रव्य साठविण्याचा अधिकार नाकारला होता. बौद्ध काळात हे राजे होते. म्हणुन यांना क्षेत्रीय पद नव्हते. क्षत्रियत्व लयास गेले हा कलंक लावुन. जे आपले सोईचे आशाना क्षत्रीय पद दिले जावु लागले. यातुन तेली शुद्र ठरविला यातुन तेल्याला शारीरीक कष्टाची कामे करण्याची जबरदस्ती केली. यातुनच त्याची विचार करण्याची सत्या जवळ जाण्याची उमेद मुळा सहित उपटून टाकली. आशा या तेली समाजातील मी एक घटक. मी उभा राहिलो. त्याला हे कारण. मला जरूर देव हवा होता. मला समता हवी होती. आणि या सगतेसाठी मी चाकण वरून सुदुंबरे, देहु, लोहगांव, पुणे इथे तुकोबा बरोबर जात होतो. ही लढाई दिसते तेवढी सोपी नव्हती. ज्या समुहातुन आम्ही आलो होतो ते सर्व समाज शुद्र म्हणुन हिणवले ले त्यांच्यातील उर्मी कोमजुन टाकलेल्या, जगण्यांची फक्त धडपड मंद अग्नीवर ठेवलेली. आशा वेळी निश्चीत विचार झाला. जे सांगायचे ते पोपटपंची नव्हे. जे करावयाचे ते आपल्या साठी नव्हे. जे बोलक्याचे ते प्रथम आपल्या रोजच्या जगण्यात प्रतिबिंब उमटलेले असावी. तुकोबांनी आपल्या घरची सावकारी कागद पत्रे नदीत बुडवली. आणि मी सुद्धा जगण्या पुरते मिळवावे. बाकी सर्व दुसर्या साठी करावे. बैलाचा घाणा हाकता हाकता बाजार हाट करता करता माझा मी नवा रस्ता निर्माण केला. माणुस म्हणुन घडू लागलो. खरा माणुस खरा देव शोधु लागलो. पहिला संसार पाहण्यास शिकलो. खरा डोळस । झालो. डोळे सर्वांना असतात. सूर्य प्रकाश जसा शेवटच्या टोका पर्यंत जातो । तसे सुर्य प्रकाशाला भेदा भेद नसतो तसे डोळे उघडल्यावर नजर जाईल त्या ठिकाणा पर्यंत जे आहे ते दिसते. त्या दिसण्यातला खोटे पणा दिसण्यातलीलबाडी दिसण्यातली भेदूगीरी, दिसण्यातली लपवेगीरी. ख-या अर्थाने मानवता ही समजु लागली. याच भक्कम आशा विचारावर पुढेच महायुद्ध लढु शकलो.