मी संत संताजी बोलतोय ! भाग 2 - लेखक मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
तुकाराम काय किंवा मी काय ? शुद्र ठरविलेले. वेद आमच्या साठी नव्हते राज्य कारभार आमच्या कडे नव्हता. न्याय निवाडा आमच्याकडे नव्हता. आम्ही कष्टकरी आम्हाला तो अधिकार इथल्या व्यवस्थेने नाकारला होता. या बद्दल बोलाल तर शिक्षा ही त्यांनी तयार केलेल्या धर्मग्रंथाच्या पाना पानात लिहिली होती. त्यामुळे शेकडो वर्ष आमच्या घराण्यात हे अधीकार नव्हते. आम्हाला हे अधीकार दिले नाहीत याचा सार्थ अभिमान वाटत होता. कारण त्या काळी हे अधीकार ज्यांना होते ती मंडळी गर्वाने मातली होती. मानवता तुडवत होती. हे काम आम्ही अंत्यजाचे म्हणजे हिन माणसाचे मानत होतो. यातुन देवाला ही अंधारात ठेवुन मगरूरी माजली होती. धर्माच्या नावा खाली अन्याय, शोषण नितीचे लक्तेरे वेशीवर टांगली जात होती. तेली, कुणबी, माळी या सारख्या जाती फसवल्या जात होत्या राजरोस प्रतिष्ठीत पणे त्यांना भरडले जात होते. हे रंजलेले, गांजलेले जात समुह आपल्या पोटात संत नामदेवाना जपुन होते. पैठणच्या हेमांड व बोपदेव या दहशदवाद्यांच्या विरोधात लढणारे नामदेव हवे हवे वाटत होते. राज सत्ता कोणाची आहे हे गौन समजुन । आमची धर्म सत्ता अबाधीत राहिली पाहिजे या साठी दबाव तंत्र अवलंबणारे होते. आन्यायाला गर्वाने प्रतिष्ठा समजणारे सर्व बाबतीत अबाधित होते. तर त्या विरूद्ध आम्हाला शुद्र ठरवुन पिड्यान पिड्या बाधीत केलेले होते. आमच्याकडे दया होती. आमच्याकडे दाभीक पणा नव्हता. समाजाच्या जगण्याचा एक घटक असल्याने आमच्याकडे सत्य होते. आमच्या जवळ राजकीय व धार्मीक सत्ता जरूर नव्हती पण विठ्ठलाच्या दारातल्या समतेचे आम्ही वारसदार होतो. हा वारसा हीच आमची ताकद होती. ही ताकद नाठाळ मंडळींना वटणीवर आणनारी होती. सर्वस्व हिसकावल्या गेलेल्या समाजातील रंजल्या गांजल्या समुहाला जगण्याची नवी उमेद देण्याचे बळ आमच्याकडे होते. समाज जीवनात संसार चालविताना तुकोबाराया बरोबर असताना मला या बाबच चिंतन करता आले. सत्या जवळ जाता आले. भक्ती अंतरंगात रूजवता आली. मानवता उभी करण्याचे मार्ग मिळू लागले. आम्हाला किर्ती, पैसा, राज्य, वैभव मिळवायचे नव्हते किंवा पिड्यान पिड्या आहे ते टिकवायचे नव्हते तर आम्हाला पायदळी तुडवणा-यांना वटणीवर आणावयाचे होते. संत तुकोबांना किंवा मला कोणत्याही असाह्यातुन संसार पासुन दुर जावे लागले नव्हते मी ही तुकोबा गत नेटका संसार करीत होतोच. पण आम्ही एक साधन जवळ केले. किर्तन संत नामदेव जेंव्हा देवा विषयी, समते विषयी काही सांगु लागले तेंव्हा त्यांना देवळात नव्हे तर देवाच्या मागच्या बाजुला किर्तन करावे लागे. त्यांना किर्तन हे माध्यम माहित होते. या किर्तनातुन समाज घडेल. या किर्तनातुन तो समता म्हणजे काय शिकेल. या किर्तनातुन तो माणुस घडेल. या किर्तनातुन तो हाक्क मागेल. या किर्तनातुन समता निर्माण होईल. हे किर्तन नामदेवांचे होते. हे किर्तन हेच आमचे शस्त्र होते. आणि म्हणुन खल करणा-यांना समजले नाही आमच्या बरोबर संघर्ष करणे त्यांना परवडणारे नव्हते. जड जाणारे होते.
गोड बोलुन लुटणा-यांच्या बापाचे बाप.
अशाच एका किर्तनात तुकोबारायांनी एक असुड हाणला.
अभक्त. ब्राम्हण जळो त्यांचे तोंड ॥
काय त्यासी रांड प्रसवली ॥1॥
वैष्णव चांभरि धन्य त्याची माता ।
शुद्ध उमयता कुळ याती ॥2॥
एैसा हा निवाडा जालासे पुराणी ॥
नव्हे माझी वाणी पदरींची ॥3॥
तुका म्हणे आणी लागो थोरपणा ।
दृष्टि त्या दुर्जना न पडो माझी ॥4॥
खरच सांगतो आम्ही समाजाला लुटणाच्या मंडळींच्या बापाचे बाप झालो. त्यांच्या हिकमती त्यांच्या लबाड्या चव्हाट्यावर आणल्या. आता आम्ही तेरा जण काही ठरवुण एकत्र आलो नव्हतो. रक्ताच्या नात्याचे नव्हतो. एकमेकाच्या गोत्याचे नव्हतो. ब्राह्मण व शुद्र याच फक्त दोन जाती त्या वेळी अस्तीवात होत्या. राज्यकर्ता जवळ सत्ता मिळविणे टिकवणे व वतने वाढविणे यात जे होते त्यातील ही कोण नव्हतो. म्हणुन आमच्या तेरा जणात कुणबी होते. बलुतेदार होते, व्यापार करणारे होते. आणि ब्राह्मण ही होते. म्हणजे आमचा लढा हा सत्य व असत्याचा होता.
लेखक : श्री. मोहन देशमाने