- शिरीष अमृतशेठ पन्हाळे
तैलिक महासभा ही कै. माधवराव पाटील दिग्रस यांनी महाराष्ट्रात उभी केली ते आमदार होते त्यामुळे त्यांनी आपली ताकद या साठी वापरली. माधवराव पाटील यांचा नाते संबंध जुना कारण माझे आजोळ त्याच ठिकाणी. यामुळे ते पुण्यात जेंव्हा तेली समाज संघटित करण्यास येत तेंव्हा कै. अमृतशेठ पन्हाळे हे माझे वडील व ते एकत्र चर्चा करून समाज संघटीत करीत होते. कै. अमृतशेठ पन्हाळे हे चांगले भाषण देत असता तेंव्हा समाज जागृतीला मदत होत होती माझे आजोळ तेथेच असताना मला हे संस्कारक्षम वयात पहाता आले आहे.
विदर्भात आपला तेली समाज भरपूर आहे. या समाजाला संघटीत करणे गरजेचे आहे. समाज माता केशरकाकूंनी ही जबाबदार त्या वेळी आमदार असलेल्या श्री. रामदास तडस यांना दिली. या वेळी तडस साहेबांनी समाजातील मतभेद, गटतट, राजकीय हेवे दावे मिटवीण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच 2013 साली सुदूंबरे येथे एैतिहासिक समाजाचा महामेळावा संपन्न झाला. यातून राज्यभर समाजा विषयी चांगला संदेश गेला पण राजकीय प्रवासात तडस साहेबांना थांबवीले गेले. परंतू माणसे जोडणारे हे व्यक्तीमत्व शांत न बसता जवळ दिलेल्या शुन्याला गिरवत न बसता देवळी नगर पालीका ताब्यात घेऊन पुन्हा सत्ताकारणाची सुरूवात केली. प्रसंगी वाडवडीलांची मिळलेली संपत्ती विकून महाराष्ट्र पिंजून काढला. समाज एैक्याला नवी दिशा दिली. समाज संघटनेला आकार दिला.
सन 2014 च्या लोकसभा निवडणूकी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात भाजपा हवे असेल तर हक्काची 10 टक्के मते तेली समाजाची रामदास तडसच देऊ शकतात. हे समोर येताच त्यांना विचारना केली. खासदारकी लढवण्यास पैसे नाहीत. जवळ फक्त समाज मतदान. फक्त आणी फक्त या भरवश्यावर ते उभे राहिले. जात दांडग्या व धनदांडग्यांना टक्कर देऊन ते विजयी झाले. हा समाजाचा विजय होता. आहे आणी उद्या असणार सुद्धा.
एक एप्रिल हा खासदार तडस साहेबांचा वाढदिवस त्यांच्या हातून समाज कार्य घडीणे ही त्यांना हार्दिक शुभेच्छा.