१९८७ ची गोष्ट आहे मी मोहन देशमाने पुण्याच्या स्वारगेट वर उतरलो. या नव्या शहरात नोकरी साठी भटकत होतो. नोकरी नाही जेवण नाही. आशा वेळी ५/७ दिवस स्वारगेट वर मुक्काम ठोकला. शेवटी समाज सहकार्य मिळावे म्हणुन समाज कार्यालयात गेलो तर एक मळकट कपड्यातील बांधवांनी स्वागत केले. हे शनी महाराज त्यांचे मुळ नाव क्षिरसागर, मला नंतर कळाले ते एक स्वातंत्र सेनानी होते इंग्रज यांना शनी म्हणत या माणसाची साडेसाती त्यांना झोंबत होती. त्यांनी इतकी दहशत इंग्रजा विरूद्ध त्यांनी निर्माण केली होती परंतु स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात संसार उध्वस्त झालेल्या या बांधवांनी समाज कार्यालयात राहुन समाजाची सेवा केली.
कै. गाजानन सायकर, हे चिंचवडचे ते सहकुटूंब कार्यालयात असत तेंव्हा वसतीगृह येथेच होते. वसतीगृहातील मुलावर लक्ष देणे १९६१ च्या महापूरात मदत केंद्र असताना त्यांनी पुरग्रस्तांना मदत केली कै. सदाशीव नगीने हेे कसबा पेठेतील सलग १५ वर्ष ते कार्यालयात होते. व्यवस्था पहात समाजाचे निमंत्रण न चुकता घरो घरी देणे आशा विविध बांधवांचे योगदान समाजास लाभले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade