वडिल प्रसिद्ध चित्रकार परंतु पैशा पेक्षा त्यांनी कलेवर प्रेम केलेले. त्यामुळे मध्यम वर्गीय वातावरणात नंदूशेठ लहानाचे मोठे झाले. पुण्यात आज शिवसेना फोफावली आहे. त्याची सुरवात त्यांनी केली. प्रचंड विरोध सहन करून ते शिवसेना उभारत होते. समाजाचे अध्यक्षपद मिळताच सर्वश्री सुधाकर पन्हाळे, ताराचंद देवराय, नंदुशेठ केदारी, संजय नगिने, बाळासाहेब अंबिके, गणेश व्हावळ, हरिश्चंद्र कटके, श्री. कृष्णा भादेकर, कै. महेंद्र व्हावळ व सौ. प्रिया महिंद्रे, सौ. मंगला जाधव या सर्व विश्वस्तांना बरोबर घेऊन त्यांनी प्रथम सामुदाईक विवाह सुरू केला यातील अडचनीला सामोरे जाताना वधु-वर मेळावा ही संकल्पना पटली. आगदी पुणे जिल्हा व सातारा, नगर, नाशीक, रायगड मुंबई येथे घरोघरी जावुन संकल्पना पटवून देऊन मेळाव्यात सहभाग वाढवला. एक पुणेकर काय करू शकतात हे सर्वांना पटले गेले.