तळेगाव ढमढेरे या आपल्या जन्म गावातुन कडुस ता. खेड, येथे व्यवसाया मुळे होते. या वेळी स्वातंत्र्याचे वारे वहात होते. या स्वातंत्र्याचा होम कुंडात सामील झाले भुमीगतांना इंग्रजांच्या हालचालींची माहीती देणे त्यांना सह्याद्रीच्या जंगलात सुरक्षित ठेवणे. जेवण पाठविणे खेड व कडुस या ठिकाणी प्रभात व सायं फेर्या करून जनजाग्रृती करणे. हे कार्य करीत असताना त्यांना अटक ही झाली. काही दिवसाची शिक्षा ही झाली स्वातंत्र्या नंतर ते पुणे येथे आले कै. बाबुराव केदारी यांचा मसाले बनवणे उद्योग होता. या ठिकाणी ते कामाला लागले. यांच्या बरोबर त्या वेळी हुकूमचंद चोरडीया हे सुद्धा कामाला होते. चोरडीया यांनी प्रविण मसाला उद्योग सुरू केला तर ल. वि. शिंदे उद्योगात यशस्वी झाले. समाजा बद्दल प्रेम असल्याने ते कार्यालयात असत. सुदूंबरे संस्थेत ते सहभाग घेत १९६१ च्या प्रलयंकारी महापुराच्या वेळी पुरग्रस्थाना मदत केंद्रात सक्रीय होते. त्यांचे चिरंजीव श्री. विजयकुमार शिंदे हे तिळवण तेली व या संस्थेचेे माजी अध्यक्ष आहेत. तसेच संताजी उत्सवाचे अध्यक्ष ही होते.