यवतमाळ जिल्हा तेली समाज महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन. नुकताच सी.बी.एस.ई. व स्टेट बोर्डाचा १० वी व १२ वी चा निकाल जाहीर झाला आहे. तेली समाजातील अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये नावलौकीक मिळविले आहे. तेव्हा त्यांचा गुणगौरव सोहळा तेली समाज महासंघातर्फे गेली अनेक वर्षापासून केला जात आहे. तेव्हा १० वी व १२ मध्ये ७५% गुण मिळविलेल्यांचा यावर्षी सुध्दा गुणगौरव करण्याचे आयोजन करण्यात आलेला आहे. तेव्हा आपल्या मार्कशीटची साक्षांकीत प्रत संताजी नागरी सहकारी पतसंस्था, शिवाजी गार्डन, शिवाजी ग्राऊंड जवळ, यवतमाळ येथे ३० जून २०१८ च्या आत आणून द्यावी किंवा पोष्टाने पाठवावी असे आवाहन तेली समाज महासंघाचे राज्य संघटक ज्ञानेश्वर रायमल यांनी केले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade