मनगट व डोके जेंव्हा एक होते तेंव्हा तेली समाजाला काहीच मिळु शकत नाही. १९३० सुमाराला मराठा व ब्राह्मण हा वाद शिंगेला पोहचला होता. पण या दोघांचे एकच भक्ष्य म्हणजे तेली. माळी, कुंभार या जाती. या वेळी डेक्कन जिमखाना येथून कै. शंकर नाना करपे पुणे नगर पालीकेचे नगरसेवक म्हणुन निवडून आले हाते. नगराध्यक्ष मराठा किंवा ब्राह्मणच असावा. परंतु त्यावेळी प्रचंड विरोध अंगावर घेत शंकरराव करपे नगराध्यक्ष झाले. हार न माणनार्या या जमाती मधील आचार्य आत्रे यांनी सुर लावला. सायकलवर बसला कसा शंकर नाना खाली बसा. कै. करपे यांनी आशा विरोधाला न जुमानता पुण्याचा विकास ही केला.