या परिसरात स्थानिक व स्थलांतरीत बांधव एकत्र येण्याची खरी सुरूवात १९९० च्या दरम्यान सुरू झाली. महाराष्ट्र बोर्डातिल श्री. गंगाराम हाडके, श्री. हनुमंत फल्ले, श्री. सुभाष काका देशमाने संत संताजी पालखीचे स्वागत करण्यास विश्रांतवाडी येथे जात यातुनच १९९२ च्या दरम्यान सर्वश्री सुभाषकाका देशमाने, गंगाराम हाडके, शिवाजी ठोंबरे हणुमंत फल्ले, मधुकर खोंड, मोहन देशमाने, सौ. मिनाश्री मखामले अशा मंडळींनी समाज एकत्र करण्याचा प्रयत्न चालु केला. यासाठी येरवडा, वडगावशेरी, लोहगांव, विश्रांतवाडी, चंदननगर, वाघोली फुलगाव आसा सर्व परिसर एकत्र करून श्री. संत संताजी महाराज विविध कार्यकारी संस्था रजीस्टर केली. यासाठी विविध कार्यक्रम राबविले गेलेे. संस्थेसाठी समाज बांधवांनी वाघोली येथे जागा घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते शक्य झाले नाही आणि कार्यकाल थांबू लागले. संस्था मान्यता थांबली म्हणनू पुन्हा सुरूवात केली. सर्वश्री सुभाष काका देशमाने, शिवाजीराव ठोंबरे यांच्या विचार प्रक्रियेतुन नवी संस्था उदयास आली आज श्री. पंडीतराव पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संस्था रजीस्ट्रेशन सुरू आहे.