पुणे शहराचा दक्षिण परिसरात समाज बांधवांच्या ओळखी अडचनीवर मात व स्नेह भाव वाढावा यासारठी बांधव प्रथम एकत्र येऊ लागले. चव्हाण नगर , धनकवडी, बालाजी नगर, आंबेगा पठार आणि कात्रज परिसरातील सर्व बांधव एकत्र येऊ लागले. या साठी प्रत्येक महिण्याचा रविवार निश्चीत केला गेला. या वेळी शक्य तो सर्व बांधव एकत्र येऊन सामाजिक प्रश्नावर चर्चा व विनिमय करतात. समाजाचे उत्सव व धार्मीक कार्यक्रम साजरे केले जातात. सर्व जन बांधवांच्या सुखात व दु:खात एकत्र येतात त्यामुळे आपन एकटे आहोत ही जाणीव होत नाही उलट सर्वात एकी व एकोपा साधला जातो. एकत्र येऊन सहकुटूंब सह सहल काढली जाते. या परिसराचे एक अनुकरण करावी अशी बाब म्हणजे. या ठिकाणी सर्वच अध्यक्ष असतात, सर्वच विश्वस्त आसतात मुळात ही संस्था रजीस्टर नाही व रजीस्टर केली जाणार नाही. पावती नाही पैसे मागने नाही. ही वाटचाल वेगळी व आदर्श युक्त आहे. सदर कार्य काल सातत्याने परिपुर्ण व्हावा या साठी सर्वश्री रोहिदास हाडके, पाडुंरंग चव्हाण, हरिष देशमाने, विष्णू चव्हाण प्रकाश कोकणे, सुरेंद्र राऊत यांचा विशेष सहभाग आसतो.