तेली समाज महासंघातर्फे दि. 09 जुलै 2018 च्या ओ.बी.सी. च्या आंदोलनात सहभागी होण्याचे तेली समाज बांधवाना आवाहन वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय कोट्यात ओ.बी.सी. ना 27% आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र केंद्रीय वैद्यकीय समितीने देशभरातील 177 वैद्यकीय महाविद्यालयामधील केंद्राच्या 15% राखीव जागांमध्ये केवळ 2% आरक्षण ओ.बी.सी.ना दिले आहे.
देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी 63835 जागांमधून 15% जागा राष्ट्रीय स्तरावर आरक्षीत ठेवण्यात आलेल्या होत्या.
देशातील 177 वैद्यकीय महाविद्यालयात केंद्राच्या 15% आरक्षणानुसार एकंदर 3711 जागा आहे. ओ.बी.सी.च्या 27% आरक्षणानुसार 1002 जागा आरक्षीत असायला पाहिजे. परंतु केवळ 74 जागा ओ.बी.सी.ना आरक्षीत करुन देण्यात आले आहे. आरक्षणाचे सर्व निकष, सुचना तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना डावलून केंद्रीय मंडळाने वैद्यकीय शिक्षणासाठी (एम.बी.बी.एस.साठी) फक्त 74 जागा ओ.बी.सी साठी आरक्षीत असलेल्या 928 जागांसह एकूण 2811 जागा खुल्या प्रवर्गासाठी सोडण्यात आलेल्या आहेत. हा ओ.बी.सी.वरील अन्याय आहे. त्यामुळे ओ.बी.सी. विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हक्काचे 27% आरक्षण 2018-2019 या शैक्षणिक वर्षात त्वरीत लागू करावे.
याकरीता ओ.बी.सी.ना न्याय मिळवून देण्यासाठी तेली समाज बांधवांनी दि. 09 जुलै 2018 रोजी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यासमोर, आझाद मैदान जवळ, यवतमाळ येथे होणान्या ओ.बी.सी. आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन महासंघाचे राज्य संघटक ज्ञानेश्वर रायमल, अशोकराव काळमोरे, संजय बारी, किशोर सुरक्र, प्रकाश वानरवडे, नरेंद्र रामेकर, राजेश गुल्हाने, सुरेश वडतकर, गुलाबराव भोळे इत्यादींनी केले.