सांगलीः अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय युवा कार्यकारिणीत विजय सकपाळ (बुधगाव) यांची निवड झाली. लखनौमध्ये कार्यकारणीत महाराष्ट्रातून त्यांची एकमताने निवड झाली. देशपातळीवर कार्यरत संघटना 106 वर्षे जुनी आहे. दिल्ली येथील तालकोट क्रीडांगणावर आयोजित तेली एकता कार्यक्रमात संकपाळ यांना अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, केंद्रीय मानव संसाधन मंत्री उपेंद्र कुशवाह, बिहारचे महसूल मंत्री राम मंडल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथन, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सुषमा साहू, आमदार शिरीष चौधरी, आमदार अरुण भस्मे राज्यातून मोठ्या संख्येने समाजबांधव, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade