संताजी फांऊंडेशन पुणे, ही तेली समाजातील एक सामाजिक जाणिव असलेली संस्था आहे. या संस्थेची स्थापना झाल्या पासून आजपर्यंत या संस्थेमध्ये मी काम करत आहे. संस्थेचे संस्थापक सदस्य श्री. प्रकाशशेठ पवार यांच्या योग्य मार्गदर्शना खाली संस्थेचे कामकाज अतिशय सुरळीत पणे चालु आहे. संताजी फाऊंडेशन ही संस्था कोणत्याही प्रकारच आर्थिक सहाय्य न घेता स्वखर्चांने उच्चशिक्षितांचे वधु-वर मेळावे वर्षातून दोन वेळा आयोजित करते.
तसेच डॉ. महेंद्रकर यांनी या संस्थे साठी धनकवडी येथे वैद्यकिय शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात सुमारे ३५० समाज बांधवांनी लाभ घेतला. संस्थेच्या वतीने सहलिचे आयोजन करण्यात येते व अतिशय अल्प दरात सहलीचे नियोजन केलं जाते.
संस्थेतील कार्यकारणी सदस्यारमध्ये एक आपलं पणाची भावना मला नेहमी जाणवतं संस्थेचे पदाधिकारी श्री. प्रकाशशेठ पवार तसेच सुर्यकांत चव्हाण हे समाजातील बांधवांना नेहमीचव मदतीचा हात पुढे करतात मी स्वत: एक रिक्षा चालक असलो तरी त्यांनी माझ्या बाबतीत कधीही भेद भाव न करता मला अनेक वेळा शक्य ती मदत केली आहे. आर्थिक असो किंवा व्यवसायिक अडचनीला हे माझ्या मदतीला धावून येतात. सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की संताजी फाऊंडेशनच्या माध्यमातुन मी काम करत असताना आम्ही एकजुटींने व समाजासाठी निरपेक्ष भावनेने काम करतो याचा आनंद मला खुप वाटतो. समाज आपला आहे आपण समाजाचे आहोत ही भावना प्रत्येक समाज बांधवांनी मनात बाळगावी.