शासकीय सेवतुन निवृत्त झाल्यानंतर मी संताजी फांउंडेशन या तेली समाजाच्या संस्थेत मा. श्री. प्रकाशशेठ पवार यांच्या प्रत्साहाने सक्रिय झालो.
सदरच्या संस्थेतील शिस्तबद्ध कामाचे नियोजन तसेच पदाधिकार्यांची सामाजासाठी असलेली आपुलकी सर्व घटकांना एकत्र आणण्याची प्रवृत्ती व समाजाचे जीवनमान कशा प्रकारे उन्नत करता येईल या बाबींची तळमळ मला जाणवली मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून या संस्थेत कार्यरत असलो तरी घेण्यात येणारे निर्णय हे सर्वानुमते घेतले जातात ही बाब उल्लेखनिय आहे.
संस्थेच्या वतीने उच्चशिक्षित उपवरांचा वधु वर मेळावा वर्षातुन दोन वेळ अतिशय देखना व शिस्त बद्ध पणे आयोजित करण्यात येतो या मेळाव्याचे आयोजन व नियोजन श्री. प्रकाशशेठ पवार, संजय शेजवळ रामचंद्र चव्हाण, परशुराम जाधव, विजय खळदकर इत्यादी पदाधिकारी यशस्वी पणे पार पाडत आसतात तसेच वैद्यकिय शिबीर, धार्मिक सहलींचे आयोजन नोकर्यासाठी करण्यात येते. दिवाळी मध्ये दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात येते व या कार्यक्रमास सामाज बांधव मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असतात.
एक उल्लेखनिय बाब अशी की संताजी फाऊंडेशन पुणे ही संस्था समाज बांधवांच्या उन्नती साठी तसेच समाजातील वैयक्तीक व व्यावसायिक दृष्टीने गरजूना मदत करण्याचे काम करते समाजातील उच्चशिक्षीत तसेच. आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या बांधवांने एकत्र येऊन समाज मनात मानाचे स्थापन प्रस्थापित करावे व समाजातील जी युवा शक्ती आहे त्यांचा समाजाच्या उन्नतीसाठी वापर करून त्यांना समाजमनात मुख्य प्रवाहात आणणे मी संताजी फांऊडेशनचा उपाध्यक्ष म्हणुन श्री. प्रकाशशेठ पवार यांचे बरोबर काम करताना खरोखर मनोमन समाधान प्राप्त होते. व एक समाजिक बांधिलकी म्हणुन आपण खारीचा वाटा उचलतो याचे समाधान मिळते.